बाहर हालात कुछ और अंदर कुछ! शौचालयानजिकचे थुंकून रंगविलेले बेसिन

Dilapidated situation in Nagpur Municipal Zone
Dilapidated situation in Nagpur Municipal Zone
Updated on

नागपूर : रस्त्यावरून आत प्रवेश करताना प्रशस्त गेट आणि पार्किंगसाठी आत मुबलक जागा पाहून मनाला थोडं बरं वाटतं. परंतु आत शिरले की चालताना दोन्ही बाजूस मोकळ्या जागेत ठेवलेले कुलर्स, कपाट आदींच्या उगाच गर्दीमुळे कोंडल्यासारखं होतं. विशेष म्हणजे आतील भागात असलेल्या मोकळ्या भागात जप्त केलेले, दुर्लक्षित असे मोठे सामान पडून आहे. शौचालय व त्याआजूबाजूला असलेल्या अस्वच्छतेमुळे नाकावर रुमाल बांधून जावे लागते एवढी दुर्गंधी येते. ही परिस्थिती आहे न्यू कॉलनीस्थित मंगळवारी झोनची. 

कोरोनामुळे झोन ऑफिसमध्ये फारशी वर्दळ होत नाही. तरीही शुक्रवारी येथे काही नागरिक आले होते. संवाद साधला असता अनिल नरोटे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज ते व्हेटरनरी चौकात रस्त्यांवर अतिक्रमण करून अनधिकृत चिकन, मटणची दुकाने थाटण्यात आली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी एकत्र येत विक्रेत्यांविरोधात आघाडी उघडली आहे. मात्र विक्रेते दाद देत नाही. फ्रेन्ड्स कॉलनी, स्वामी नगर, आदर्श नगर परिसरात मोकाट कुत्रे, डुकरांचा उच्छाद आहे. 

अनेकदा मोकाट कुत्रे आणि डुकरांमुळे अपघातही घडले आहेत. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करणार आहे. सतेज सातव यांनी सांगितले की आमच्या परिसरात पाणी, घरकुल आणि पट्टेवाटपाबद्दल तक्रारी आहेत. परंतु कोविडमुळे सारे थंडबस्त्यात आहे. त्याचा पाठपुरावा करण्यासाठी येथे आलो होतो. येथे आलेले एक सामाजिक कार्यकर्ते म्हणाले की अतिक्रमण, कचरा, अस्वच्छता या समस्यांबाबत झोनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटून निपटारा करावा अशी मागणी करणार आहे. 

याविषयी झोनच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांगितले की सध्या बहुतांशी मनुष्यबळ लसीकरणासह विविध कामांमध्ये गुंतले आहे. काही जण आजारी आहेत. कोरोनामुळे तक्रारींचा निपटारा जरी काही प्रमाणात थंडावला आहे, हळूहळू परिस्थिती नॉर्मल होताना ऑफीसअंतर्गत स्वच्छतेकडेही लक्ष दिले जाईल. 

संबंधित कर्मचारी सापडत नाही
सुटीच्या दिवशीही टॅक्स आकारणी सुरू असते. मात्र, म्यूटेशन आणि इतर काही कारणांमुळे आमचा टॅक्स अद्याप चढवलेलाच नाही. त्यासाठी येथे आले की नेमके संबंधित कर्मचारी सापडत नाही. त्यामुळे मनस्ताप होतो. 
- रमेश भालेराव, नागरिक

तारेवरची कसरत

कोविड आणि लॉकडाउनमुळे कर्मचारी नेहमीच्या कामांसह लसीकरण व इतर कामातही व्यस्त आहेत. सगळी कामे सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते. बहुतेक वेळी येथील कर्मचारी सोपविलेल्या इतर कामासाठी गेले असताना नागरिक येतात. त्यामुळे त्यांचे काम होत नाही व ते त्रागा करतात. तरीही सर्व पेंडिंग कामे लवकरात लवकर निपटण्याचे नियोजन असल्याचे येथील एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याचा अटिवर सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.