नागपूर - गणेशोत्सवानंतर येणाऱ्या सणासुदीच्या आनंदावर विरजण पडणारी बातमी आहे. कारण रिफाइंड सनफ्लॉवर ऑइल आणि अन्य खाद्य तेलावरील कस्टम ड्युटी वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आयात शुल्कात २० टक्के वाढ करण्यात आल्याने खाद्य तेल महागले आहे. सोयाबीन, राइस ब्रॅण्ड, वनस्पती तूप, सरसो तेलाच्या दरात प्रतिकिलो २० रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकांचे बजेट बिघडणार आहे.