Chess Championship : नागपूरची सुवर्णकन्या दिव्या बुद्धिबळातील ‘क्वीन’; २० वर्षाखालील मुलींच्या गटातील जागतिक विजेतेपद

आंतरराष्ट्रीय मास्टर असलेल्या १८ वर्षीय दिव्याने शेवटच्या फेरीत पांढऱ्या सोंगट्यानिशी खेळताना बल्गेरियाच्या महिला ग्रँड मास्टर बेलोस्लावा क्रॅस्टेवावर मात केली.
नागपूरची सुवर्णकन्या दिव्या बुद्धिबळातील ‘क्वीन’
नागपूरची सुवर्णकन्या दिव्या बुद्धिबळातील ‘क्वीन’Sakal
Updated on

Nagpur News : नागपूरची सुवर्णकन्या दिव्या देशमुखने गांधीनगर (गुजरात) येथे झालेल्या जागतिक ज्युनिअर बुद्धिबळ स्पर्धेत २० वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपदाला गवसणी घालून आपण या खेळातील महाराणी आहोत, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले. हे तिचे या गटातील पहिलेच जागतिक विजेतेपद होय.

आंतरराष्ट्रीय मास्टर असलेल्या १८ वर्षीय दिव्याने शेवटच्या फेरीत पांढऱ्या सोंगट्यानिशी खेळताना बल्गेरियाच्या महिला ग्रँड मास्टर बेलोस्लावा क्रॅस्टेवावर मात केली. तिसऱ्या मानांकित असलेल्या दिव्याने ११ पैकी १० गुण प्राप्त करीत विजेतेपदाला गवसणी घातली.

मे महिन्यात शारजा चॅलेंजर्स स्पर्धेचे विजेतेपद मिळविल्यानंतर तिचे हे सलग दुसरे विजेतेपद होय. दहाव्या फेरीत भारताच्याच साची जैनचा २६ चालीत पाडाव करून दिव्याने विजेतेपदाच्या दिशेने पाऊल टाकले होते.

क्रॅस्टेवाला ११ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. अर्मेनियाच्या मरिअम मॅक्रेचनने ९.५ गुणांची कमाई करीत उपविजेतेपद तर अझरबैजानच्या अयान अल्लाहवेरने तिसरे स्थान मिळविले. स्पर्धेत २७ देशातील १०१ खेळाडू सहभागी झाले होते. आता या कामगिरीमुळे दिव्याला फिडे रेटींगमध्ये अव्वलस्थान मिळविण्याची संधी आहे. हे तिचे ज्युनिअर गटातील आठवे विजेतेपद होय.

या स्पर्धेत अनेकांच्या माझ्याकडून अपेक्षा होत्या. त्याचप्रमाणे मलाही माझ्या अपेक्षा होत्या. यापैकी कुणाला किती महत्त्व द्यायचे हे मला माहिती आहे. त्यामुळे चांगला खेळ करायचा ही जाणीव होती. अशा स्पर्धेच्या माध्यमातून दबाव कसा हाताळायचा हे मी शिकले.

- दिव्या देशमुख, विश्वविजेती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.