‘झिरो बजेट’मध्ये गेली नोकरी; खचून न जाता दुग्ध व्यवसायात घडवली क्रांती, लांडे बाबांचा व्यवसाय बहरला

Dnyaneshwar Lande made progress in the dairy business
Dnyaneshwar Lande made progress in the dairy business
Updated on

हिंगणा (जि. नागूपर) : तालुक्यातील पठारावरील मुळ निवासी असलेले ज्ञानेश्वर लांडे ३० वर्षांपासून कवडस येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे शिक्षण बीकॉम (द्वितीय) वर्षपर्यंत झाले आहे. यानंतर ते अमरावती जिल्ह्यातील जिल्हा उपनिबंधक कार्यालयात कारकून म्हणून कामाला लागले. काही वर्ष नोकरी केल्यानंतर ‘झिरो बजेट’मध्ये त्यांची नोकरी गेली. स्वाभाविकच त्यांनी परत गाव गाठले. गावातीलच जगदंबा दुग्ध व्यवसाय संस्थेत ३०० रुपये पगारावर त्यांनी काही वर्ष नोकरी केली. यातून त्यांना दुग्ध व्यवसायाविषयीची चांगली माहिती मिळाली. १९९० साली त्यांनी या व्यवसायात उतरायचे ठरवले. त्यासाठी त्यांनी एक जर्सी गाय खरेदी केली. या गायीला एक कालवड झाली. ही गाय दररोज २५ लिटर दूध देत होती. स्वाभाविकच त्यामुळे त्यांना दुग्ध व्यवसाय सुरू करता आला.

या व्यवसायाच्या भरवश्‍यावर गावात २२ एकर शेती खरेदी केली. शेतात व गावात घरे बांधली. या शेतातच जनावरांसाठी मुक्तसंचार गोठा बांधला. आता त्यांच्याकडे ३० गायी, १० म्हशी व २० कालवडी आहेत. त्यांना नीतीन व कुणाल अशी दोन मुले आहेत. दोघांचेही बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. शेतातच त्यांचे घर असून पत्नी पुष्पा व नितीन हा मुलगा त्यांच्या दुग्ध व्यवसायात हातभार लावतो.

कुणाल नावाच्या मुलाला त्यांनी गावातच एक हॉटेल उघडून दिले आहे. सद्यस्थितीत १५० लिटर दूध रोज काढले जाते. यातील १०० लिटर हल्दीराम, ४० लिटर मदर डेअरी व १० लिटर कुणालच्या हॉटेलमध्ये पाठविले जाते. त्यांचा दुग्ध व्यवसाय तर भरभराटीस आलेला आहे. पठारावरील भागात सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने निसर्गावर अवलंबून शेती करावी लागते. दिवसेंदिवस शेती व्यवसाय आर्थिक संकटात सापडत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करावा, यासाठी लांडे परिवार धडपडत आहे.
 
‘झिरो बजेट’मध्ये नोकरीवर गदा आल्याने आलेल्या संकटाने खचून न जाता सतत धडपड करीत सुरू केलेला दुग्ध व्यवसाय भरभराटीला आल्यावर आपल्यापुरत न बघता इतरांच्या चांगल्यासाठी झटणाऱ्या लांडे यांनी दुग्ध व्यवसायात शेतकऱ्यांनी पाऊल ठेवावे, यासाठी स्वतःच्या शेतातच जनावरांचे पशुप्रदर्शन आयोजित केले. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. ज्ञानेश्वर लांडे या गृहस्थाने पहिल्या प्रथम घरी आलेल्या गाईच्या भरोशावर कुटुंबाचे पालनपोषण केले. एवढेच नाही तर दुग्ध व्यवसायात क्रांती घडवली.

पहिल्या गोमातेची शेतात समाधी

गायीच्या ठायी तेहतीस कोटी देवांचा वास असल्याचे आपण मानतो. कामधेनू गाय. तिचीच जणू कृपा झाल्याने ज्यांचा दुग्ध व्यवसाय भरभराटीला आला, असे ज्ञानेश्वर लांडे. दुग्ध व्यवसायात पाऊल टाकल्यानंतर त्यांनी पहिली गाय खरेदी केली. त्यांचा दुग्ध व्यवसाय भरभराटीला आला. त्यांनी त्या गायीचा मृत्यू झाल्यानंतर कृतज्ञतेने तिची समाधी शेतात बांधली. ती कुटुंबाचाच भाग असल्यासारखं तिची तेरवीही केली.

यानंतर दरवर्षी कार्तिकी एकादशीला त्या गायीची पुण्यतिथी ते साजरी करतात. या गोमातेची एक मूर्ती त्यांनी बनवली असून तिची रोज नियमितपणे घरी पूजा-अर्चा सुद्धा लांडे परिवार करीत आहे. एका गायीने लांडे परिवाराचे आयुष्य बदलून टाकले. याबद्दल हा परिवार गोमातेचे ऋण मानतो, श्रद्धा बाळगतो एवढं मात्र निश्चित.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.