पालकांनो सावधान! मुलांवर कधीही हात उगारू नका; नाही तर भोगावे लागतील भयंकर परिणाम

do not beat your children otherwise be ready to face problems
do not beat your children otherwise be ready to face problems
Updated on

नागपूर : माणूस हा चुकांचा पुतळा आहे, असे म्हटले जाते. काम करणाऱ्या माणसांच्या हातातून चुका होतात असेही म्हटले जाते. चुका होणे हे स्वाभाविक आहे. चुकांमधूच माणूस शिकत असतो. तसेही चुकांमधून कधी न विसरणारा धडा माणसांना मिळत असतो. एकदा केलेली चूक पुन्हा पुन्हा करू नये बस हेच चुकांमधून शिकायच असतं आणि लक्षात ठेवायच असतं. मात्र, लहान मुलांकडून चूक झाल्यास पालक रागावतात. रागाच्याभरात मुलांवर हात उचलतात. परंतु, याचा लहान मुलांवर काय फरक पडतो? याचा विचार करीत नाही. चला तर जाणून घेऊया मुलांना रागावल्याने मनावर काय पिरणाम होतो जाणून घेऊ या...

लहान मुले हे देवांचे रूप असतात असे म्हणतात. लहान मुल म्हटल तर मस्ती आलीच, आपसात भांडण होणारच. घरातील वस्तूची नासाडी ते करतातच. एखादी मोल्यवान वस्तू तोडून टाकतात, कधी पेनाने घरातील भिंती रंगवूत टाकतात, कामात असताना मोबाईलसाठी रडतात. काही मुल दिवस-रात्र मोबाईलच घेऊन राहतात. अशावेळी आई-वडिलांची मोठी चिडचिड होते. जास्त राग आल्यास मुलांवर हातही उचलतात. यामुळे त्यांची चिडचिड अधिकच वाढते. अशावेळी त्यांना प्रेमाने समजावले पाहिजे.

सांगण्याचा उद्देश इतकाच की आई-वडील आपल्या पाल्यांना प्रेमाने समजावून सांगत नाही. काही पालक व्यवस्थित सांगतात पण सांगताना आपल्या रागावर नियंत्रण ठेवत नाही. अशा काही पाल्या मुलांवर हातही उचलतात. लहान मुलांना तणावापासून वाचवायला पाहिजे. लहान सहान गोष्टींवर त्यांना बोलायला किंवा रागवायला नाही पाहिजे. मुलांना समजवण्यासाठी प्रेम हा एक उत्कृष्ट पर्याय आहे. असे न केल्यास मुलांवर वाईट परिणाम होतो आणि खालील गंभीर परिणाम दिसून येतात.

आई-वडिलांचा राग

जे पालक आपल्या मुलांना जास्त रागावतात त्यांच्या मुलांच्या मनात त्यांच्याविषयी राग निर्माण होतो. त्यांना असे वाटते की आई-वडील आपल्याला प्रेम करीत नाही. यामुळेच ते आपल्याला सारखे रागवत असतात. असे विचार त्यांच्या मनात घर करून जातात. यामुळे आई-वडिलांचा राग करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे मुलांना कधीही मर्यादेपेक्षा जास्त रागवू नये.

आत्मविश्वासाची कमी

जास्त ताणतणावामुळे मुलांच्या आत्मविश्वासात कमी येते. या तणावामुळे त्याच्या मनावर वेगळीच छाप उमटते. कोणतेही काम करताना ते भीतीदायक स्वभावाने करतात. कोणतेही काम करण्यासाठी आत्मविश्वासाची गरज असते. आत्मविश्वास नसल्यास साध्य होत असलेले कामही त्याच्या आत्मविश्वासाच्या कमीने अर्धवट राहते. त्यामुळे कधीही मुलांना चांगल्या गोष्टींचा सल्ला द्यावा.

मुल होतात हिंसक

मुलांचे पहिले गुरू आई-वडील असतात. त्यांना जे दिसते तेच ते शिकतात. त्यामुळे आई-वडिलांनी प्रत्येक गोष्टीचा विचार करून मुलांना समजूत घालावी. मुलांसोबत आपण जास्त मारहाण करीत आहात तर तेही त्या सर्व गोष्टी शिकत असतात. भविष्यात त्याला त्या गोष्टींची सवय लागते. म्हणजेच तो हिंसक बनतात.

विद्रोही होणे

खूप वेळा असे पाहिले जाते की मुले मार खाऊन खाऊन थकतात. त्यांची सहनशीलता संपते. ज्यामुळे मुलांचे वागणे विद्रोही होते. ते जाणून-बुजून चुका करतात. त्या मुलांना चांगले काम होत असेल तरीही त्या विद्रोही स्वभावामुळे ते वाईट कामे करतात. त्यांना त्यातच मजा वाटते. त्यामुळे मुलांवर कधीही जास्त बंधने घालू नये. आणि मर्यादित नियम किंवा अटी घालाव्या.

जास्त राग येणे

मुलांना जास्त मारहाण केली तर भविष्यात ते जास्त राग करू शकतात. कारण, लहानपणी त्यांच्यावर झालेल्या छोट्या छोट्या गोष्टीवरून ताणतणावामुळे मोठ्यापणी ते छोट्या छोट्या गोष्टींवरही राग करू लागतात. मुलांच्या मनात आपले चित्रं हे स्वच्छ प्रवृत्तीचे असावे अशी त्याला वागणूक द्यावी.

मानसिक रूपाने दुःखी

जास्त मारहाण केल्याने मुलांची मानसिक स्थिती चांगली राहत नाही. त्यांना असे वाटते की सगळ्या वाईट गोष्टी त्याच्यात सामावलेल्या आहेत. मोठ्यापणी तो स्वतःची इज्जत स्वतः करू शकत नाही. त्यामुळे मुलांना मानसिक स्थिती ने मजबूत ठेवावे. त्याच्या मनात किंवा त्याच्या समोर उत्तम विचारसरणी मांडावी.

संकलन आणि संपादन - नीलेश डाखोरे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.