फटाक्यांनी इजा झाली तर डोळ्यांना चोळू नका

प्रकाश देणारे फटाके वाजवा; फटाक्यांचा धूर घातकच
फटाक्यांनी इजा झाली तर डोळ्यांना चोळू नका
फटाक्यांनी इजा झाली तर डोळ्यांना चोळू नका sakal
Updated on

नागपूर : डोळे म्हणजे मनाचा आरसा आहे. आनंददायी भावना डोळ्यांद्वारे प्रदर्शित होतात. दिवाळीच्या मोसमातील फटाके फोडण्याचा आनंद लहान मुलांच्या डोळ्यात दिसतो. दिव्यांचा आणि आवाजाचे फटाके फोडण्यात येणारा आनंद व्यक्त करता येत नाही. मात्र आवाजांच्या फटाक्यातील धूर डोळ्यांसाठी घातक असतो. प्रकाश देणारे फटाके फोडून आनंद व्यक्त केला पाहिजे.

फटाके फोडलेल्या ठिकाणचे तापमान प्रचंड वाढते. धूर निघतो, आवाजाचे अर्थात ध्वनिप्रदूषण, जल प्रदुषण, वायुप्रदुषणात मोठ्या प्रमाणात भर पडते. फटाक्‍यांमुळे डोळ्यांना इजा झाल्यास डोळा चोळू नका, अन्यथा डोळा कायमचा निकामी होण्याची भीती असते. गंभीर दुखापतीमुळे डोळा काढावा लागू शकतो, असे मत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नेत्ररोग विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. कविता धाबर्डे यांनी व्यक्त केले.आनंदाच्या भरात फटाके फोडताना कळत न कळत होणाऱ्या चुकांतून डोळ्यांना इजा होण्याचे प्रमाण मोठे आहे.

फटाक्यांनी डोळ्यांना इजा झाली तर चोळू नका

देशात दरवर्षी फटाक्यांमुळे पाच हजार व्यक्ती दरवर्षी अंध होतात. अशी माहिती सर्वत्र उपलब्ध आहे, यात ३० त ४०टक्के लहान मुले असतात. दिवाळीच्या सणांत नकळत बाधित व्यक्तींपैकी ६० टक्के व्यक्ती २० वर्षाखालील असतात. ८० टक्के पुरुष असतात. डोळ्यांना इजा करणाऱ्या फटाक्‍यांमध्ये प्रामुख्याने अनार, सुतळीबॉम्ब आणि चक्री आणि रॉकेटचा समावेश असतो, असे डॉ. धाबर्डे म्हणाल्या. दिवाळीत फोडलेल्या फटाक्‍यामध्ये चारकोल, गंधक, नायटो क्‍लोरेट, परफलोरेस्टसह इतरही घातक घटक असतात. फटाके फुटल्यानंतर निघणाऱ्या धुरातून फुप्फुसांवर आणि डोळ्यांवर परिणाम होतो. त्वचाविकारातही वाढ झालेली दिसते.

फटाक्यांनी इजा झाली तर डोळ्यांना चोळू नका
बँकांचे नियम बदलणार; सामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री

फटाके फोडताना

  • फटाक्‍यांपासुन सुरक्षित अंतरावर उभे राहावे.

  • पालकांच्या नजरेखाली फटाके फोडावे

  • मोकळ्या जागेत फटाके फोडावे.

  • शक्‍यतो सुती कपडे घालावे.

  • रात्री १० वाजतानंतर फटाके फोडू नये

  • ध्वनिप्रदूषण करणा-या फटाके फोडू नये

  • प्रकाश देणाऱ्या फटाक्‍यांचा वापर करावा.

"नकळत फटाके फोडताना डोळ्याला इजा झाल्यानंतर डोळे चोळू नये. डोळे चोळल्यास डोळयातील द्रव्य बाहेर येऊ शकते. डोळ्यातील फसलेले कण आत खोलवर जाऊ शकते. त्यामुळे डोळा खराब होऊ शकतो. पाण्याने डोळा धुऊ नये. तसे केल्यास जंतुसंसर्ग वाढतो. डोळ्यांमध्ये मलम टाकू नये, त्वरित नेत्र रोगतज्ज्ञांना दाखवावे."

-डॉ. कविता धाबर्डे, सहयोगी प्राध्यापक, नेत्ररोग विभाग, मेडिकल, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.