कोदामेंढी (मौदा) : चार महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया सुरू होती दुसऱ्या चार महिलांवर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्यांना भूल दिली. अन् अचानक डॉक्टरला चहाची तलफ आली, डॉक्टर मागेपुढे कुठलाही विचार न करता चहासाठी निघून गेले. असा हा जगातील पहिलाच प्रकार जिल्ह्यातीज खात येथील आरोग्य केंद्रात घडला.
यावर डॉक्टरने आपल्याला शुगर व बीपीचा त्रास असल्याने मी चहासाठी निघून गेलो असे स्पष्टीकरण दिले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून तीन सदस्यीय समिती गठीत केली आहे.
जिल्ह्यातील खात येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरात आठ महिलांवर शस्त्रक्रिया होणार होती. शस्त्रक्रियेची जबाबदारी असलेल्या डॉ. भलावी यांनी चार महिलांची शस्त्रक्रिया पूर्ण केली. मात्र त्यानंतर त्यांना चहाची तलफ आली.
यामुळे ते उर्वरित चार महिलांना बेशुद्धावस्थेत ठेवून आॅपरेशन थिएटरमधून थेट चहा पिण्यासाठी निघून गेले. यामुळे रुग्णांच्या नातेवाइकानी संताप व्यक्त केला.याबाबत जिल्हा परिषद सदस्या राधा अग्रवाल व सरपंच माधुरी वैद्य यांना कळविले. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना कळवले. त्यांनी तत्काळ दुसऱ्या डॉक्टरांची व्यवस्था करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान उपाध्यक्षा तथा आरोग्य समिती सभापती कुंदा राऊत यांनीही या प्रकरणात विस्तृत अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत.
आरोग्य केंद्रापासून आवश्यक सुविधा लांब
गावापासून आरोग्य केंद्र एक किमीवर आहे. येथे रुग्णांना, डॉक्टर अथवा कर्मचाऱ्यांना कशाचीही गरज भासल्यास दूर अंतरावर जाण्याशिवाय पर्याय नाही. साधी माचिसची काडीसाठीही एक किमी जावे लागते.
८ महिलांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया होणार होती. ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरू असल्याने चहाच्या टपरीवर गर्दी होती. दरम्यान ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांना चहाची तलफ आली. त्यांना गर्दीमुळे चहा न मिळाल्यामुळे ते निघून गेले.त्यांची प्रकृती सुद्धा बरोबर नसल्याचे त्यांनी सांगितले.
- डॉ. आशीष बेलनवार, प्राथमिक आरोग्य केंद्र, खात
मला रुग्णांच्या नातेवाईकांचे फोन आले असता त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली. रुग्णांची व्यवस्था करण्याकरिता जिल्हा परिषद उपाध्यक्षांशी संपर्क करून दुसऱ्या डॉक्टरांची व्यवस्था करण्यास सांगितले. सदर प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून घटनेची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
-राधा अग्रवाल, जिल्हा परिषद सदस्या
मी मधुमेहाचा रुग्ण असल्यामुळे मला वेळेवर चहा-बिस्किटे लागतात. हे मी आधीच येथील डॉक्टरांना सांगितले होते. मला वेळेवर चहा व बिस्कीट न मिळाल्याने माझा बीपी कमी झाला. यामुळे मी तेथून निघून गेलो.
-डॉ. भलावी
याप्रकरणी जिल्हा स्तरावर चौकशी समिती गठीत केली आहे. प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्यात येईल.
- डॉ. संजय माने, तालुका आरोग्य अधिकारी, मौदा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.