'त्यांनी' डॉक्टरांमध्ये प्रत्यक्ष बघितला देव! ऑक्सिजन लेव्हल ३० असतानाही वाचवला जीव

'त्यांनी' डॉक्टरांमध्ये प्रत्यक्ष बघितला देव! ऑक्सिजन लेव्हल ३० असतानाही वाचवला जीव
Updated on

नागपूर : खासगी रुग्णालये लुटीची केंद्र बनली असल्याची टिका होते. तर मेडिकल (Government Medical College), मेयोसारख्या (Mayo Hospital) सरकारी रुग्णालयात उपचारात हलगर्जीपणा होत असल्याची टिका नेहमीचीच. मात्र मेडिकलमध्ये एका पंचेचाळीसवर्षीय युवकच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी (Oxygen Level) ३० वर आली असताना, व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णमहिलेचा जीव वाचवण्यात मेडिकलमधील डॉक्टरांना यश आले आहे. मृत्यूच्या दारातून परत आलेल्या या रुग्णाने तसेच नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले. (Doctor saved life of patients having oxygen level 30 in Nagpur)

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकावर झाल्यानंतर खासगी रग्णालयांचे दरवाजे बंद होते. मात्र मेडिकल-मेयोमधील डॉक्टरांनी मार्च २०२०सुरू केलेली कोरोनाबाधितांवरील सेवा सुरू आहे. कोरोनाग्रस्तांना सेवा देत असताना अनेक आरोप मेडिकलवर होत आहेत, मात्र येथे शरीरीत ऑक्सिजनचे प्रमआम केवळ ३० असताना दाखल करण्यात आलेल्या रुग्णाला व्हेंटिलेटर ठेवले गेले. डॉक्टरांच्या अचूक उपचाराने ती धोक्याबाहेर आली असून तिला जीवदान मिळाले आहे.

सुमित्रा देवी (नाव बदलले) असे या महिलेचे नाव आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. हळूहळू प्रकृती खालावू लागल्यावर नातेवाईकांनी विविध खासगी रुग्णालयात नेले. तेथे खाट तसेच शरीरीची ऑक्सिजनची पातळी बघताच परत पाठवण्यात येत होते. शेवटी मेडिकलच्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. येथे प्रारंभी गैरसोय झाली. परंतु शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण केवळ ३० असल्याने पुढे ऑक्सिजन खाटेवर ठेवले.

ऑक्सिजन वाढत नसल्याने जीवनरक्षण प्रणालीचा (व्हेंटिलेटर) एक भाग असलेल्या एनआयव्हीवर (मास्क) तिला ठेवले. रुग्ण महिलेस गतीने प्राणवायू दिला जातो. एक दिवस डॉक्टरांच्या निरीक्षणात असताना तिच्यात प्राणवायूची पातळी वाढत नसल्याचे पुढे आले. त्यानंतर तिला १०० टक्के व्हेंटिटलेटवर टाकले. चार दिवस डॉक्टरांकडून विविध औषधोपचारही सुरू करण्यात आला. रुग्ण शुद्धीवर येत असल्याचे दिसून आले. रक्तदाबही सुधारला. स्वत:ही श्वास घेण्याचा प्रयत्न त्या महिलेकडून सुरू झाला. काही दिवसांत व्हेंटिलेटर मध्ये मध्ये काढण्यात येऊ लागले. सामान्य स्थितीत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली. एक दिवस व्हेंटिलेटरवर असताना प्रभाव कमी करत रुग्णाला २४ तास डॉक्टरांच्या निरिक्षणात ठेवले. सकारात्मक परिणाम दिसून आलयाने व्हेंटिलेटर काढले. रुग्णमहिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

'त्यांनी' डॉक्टरांमध्ये प्रत्यक्ष बघितला देव! ऑक्सिजन लेव्हल ३० असतानाही वाचवला जीव
पश्चिम विदर्भाच्या विकासाची ट्रेन थांबलेलीच; वाचा सरकारी अनिर्णयक्षमतेची ‘विनोदी कथा’

सामुहिक प्रयत्न

सद्या रुग्ण महिला चालत फिरत आहे. आहारातही बदल झाला आहे. श्वास सामान्य आहे. ऑक्सिनची पातळी वाढली आहे. लवकरच तिला मेडिकलमधून सुट्टी देण्यात येणार असल्याची माहिती आहे. या रुग्ण महिलेवर यशस्वी उपचारासाठी मेडिकलचे औषधशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राजेश गोसावी यांच्या मार्गदर्शनात निवासी डॉक्टर आदित्य जाधव व इतर वैद्यकीय पथकाने सामूहिक प्रयत्न केले आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ

(Doctor saved life of patients having oxygen level 30 in Nagpur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.