बापरे! तीन कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात गेला ४ वर्षीय चिमुकलीचा जीव

डॉक्टरांनी केलेल्या उपचारानंतर आराम मिळाल्याने तिला सुटी देण्यात आली
small girl dies in dog attack
small girl dies in dog attacksmall girl dies in dog attack
Updated on

टाकळघाट (जि. नागपूर) : मागील काही दिवसांपासून कुत्र्यांनी (Dog Attack) लहान मुलांवर हल्ला केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहत आहोत. एकट्या असणाऱ्या मुलांवर कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यातील टाकळघाट नजीक भारकस येथे घडली. या हल्ल्यात चार वर्षीय चिमुकली अंजली रामसोदर रावत (रा. भारकस) हिचा मृत्यू (Small Girl Dies) झाला. (small girl dies in dog attack)

प्राप्त माहितीनुसार, चिमुकली गुरुवारी (ता. १३) एमआयडीसी बुटीबोरी नजीक असलेल्या भारकस येथील रस्त्याने जात असता ठोकर लागल्याने पडली. जवळच असलेल्या कुत्र्याने तिच्या अंगावर धाव घेत चावायला सुरुवात केली. यावेळी अन्य दोन कुत्र्यांनीही (Dog Attack) तिचा चावा घेतला. चिमुकलीच्या रडण्याचा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेत तिन्ही कुत्र्यांना हाकलले.

small girl dies in dog attack
पाकिस्तानला धडा शिकवा; पीओकेच्या कुटुंबाचे मोदींना आवाहन

तीन कुत्र्यांनी चावा घेतल्याने चिमुकली गंभीर जखमी झाली. यामुळे तिला उपचारासाठी टाकळघाट येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) पुढील उपचारासाठी रेफर केले. डॉक्टरांनी केलेल्या उपचारानंतर आराम मिळाल्याने तिला सुटी देण्यात आली.

परंतु, दुसऱ्या दिवशी चिमुकलीची प्रकृती बिघडली. यामुळे तिला पुन्हा मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी (ता. १६) तिचा मृत्यू (Small Girl Dies) झाला. रामसोदर रावत हे मुळचे मध्यप्रदेश येथील रहिवासी आहेत. भारकस येथे चार ते पाच महिन्यांपूर्वी भाड्याने राहायला आले होते. अंजलीचे वडील हे बुटीबोरी एमआयडीसीतील खासगी कंपनीत काम करतात.

small girl dies in dog attack
धक्कादायक! पत्नी, दोन मुलांचा गळा चिरून खून; पतीने केली आत्महत्या

कुत्र्यांचा बंदोबस्त करा

तीन कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात (Dog Attack) चिमुकलीचा जीव गेला. यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे. शासनातर्फे जनावरांना मारण्याची परवानगी नाही. मात्र, कुत्र्यांमुळे कोणाचा जीव जात असेल तर याची दखल कोण घेणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. गावातील पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()