Gas Connection KYC : अत्यंत महत्त्वाची बातमी! हे काम करा अन्यथा बंद होईल गॅस कनेक्शन, या तारखेपर्यंत आहे अंतिम मुदत

KYC Last Date : गॅस कनेक्शनधारकांनी केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, केवायसीकडे अनेकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते.
Gas Connection KYC
Gas Connection KYCesakal
Updated on

Nagpur : गॅस कनेक्शनधारकांनी केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, केवायसीकडे अनेकांनी पाठ फिरविल्याचे दिसून येते.

अनेकांची केवायसी रखडल्याने वितरकांना डाटा अपडेट करताना चांगल्याच अडचणी येत असून केवायसी न केल्यास गॅस कनेक्शन बंद होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्याशिवाय अशा ग्राहकांना सबसिडीही मिळणार नाही.प्राप्त माहितीनुसार, केवायसी करण्यासाठी गॅस ग्राहकांना काही दिवसांपूर्वी सूचित करण्यात आले होते. नरखेड तालुक्यात वितरकांकडे ३० जून ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.

यापूर्वी दिलेल्या मुदतीत केवायसी करण्याकडे अनेकांनी पाठ फिरविल्याचे चित्र आहे. सर्वच गॅसधारकांना केवायसी करणे अनिवार्य आहे. केवायसी न करणाऱ्या नियमित ग्राहकांना तसेच उज्ज्वला योजनेच्या गॅस कार्डधारकांना ३०० रुपये दिली जाणारी सबसिडी कायमची बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गॅस सेवेचा लाभ घेणाऱ्या सर्व ग्राहकांनी केवायसी करून घ्यावी, असे आवाहन स्थानिक गॅस एजन्सीधारकांकडून केले जात आहे.अंतिम मुदतीपर्यंत गॅसधारकांनी केवायसी करणे आवश्यक आहे. अन्यथा सबसिडीसह इतर बाबी मिळणार नसल्याचे चित्र आहे.

Gas Connection KYC
Sunita Williams Trapped :सुनीता विल्यम्स अडचणीत! अंतराळातच अडकल्या; नासाकडून परतीसाठी प्रयत्न सुरु, जाणून घ्या काय आहे कारण

ही कागदपत्रे आवश्यक

गॅसधारकांनी एजन्सीत जाऊन केवायसी करू घ्यावी, त्यासाठी आधार कार्ड, मोबाइल क्रमांक, जोडणी ग्राहकांचे पुस्तक, ग्राहकांचे फेस रीडिंग किंवा हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामाध्यमातून केवायसी करता येते.

Gas Connection KYC
CSMT Air Handling : ‘सीएसएमटी’ सबवेमध्ये ‘एअर हँडलिंग सिस्टीम’ ; पादचाऱ्यांची घुसमट आता थांबणार

यापूर्वी पेट्रोलियम कंपन्यांची काही बंधने नसल्याने गॅस नियमानुसार उपलब्ध होत होता; परंतु आता केवायसीसाठी कडक नियम आहेत. केवायसी नसल्यास ग्राहकांना गॅस दिला जाणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी केवायसी करून घ्यावी.

-मीना दीपक चौधरी, संचालक, गॅस एजन्सी, जलालखेडा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.