Nagpur crime : माल पाठविला गोंदियाला, चालकाने विकला नागपुरात

Nagpur crime : दिंदरगावच्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी गोंदियाला पाठविलेली फुलकोबी वाहनचालक अश्विन नासरेने नागपूरमध्येच विकून पैसे गबन केले. संदीप काळमेघ यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली.
Nagpur crime
Nagpur Crime sakal
Updated on

जलालखेडा : दिंदरगाव येथील काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील फुलकोबी जमा करून गावातीलच संदीप काळमेघ यांच्याकडे विक्रीसाठी पाठविण्यासाठी दिली. काळमेघ यांनी ती एका वाहनात भरून गोंदियाला पाठविण्यास वाहन चालकाला सांगितले.

चालकाने त्याच्या मित्राच्या सहकार्याने वाहनातील माल गोंदियाला न नेता नागपूरमध्येच विकला. आलेले पैसे गबन करुन शेतकऱ्यांना गंडविल्याचा प्रकार उजेडात आला.दिंदरगाव येथील संदीप काळमेघ यांनी जलालखेडा पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार त्यांचा गावातच भावेश मिनी ट्रान्सपोर्ट नावाने व्यवसाय आहे.

ते दररोज शेतकऱ्यांच्या शेतातील फुलकोबी गोंदिया येथील ‘होलसेल मार्केट’ मध्ये विक्रीकरीता वाहनांमधून भाडयाने पाठवितात. ते आश्विन नासरे (रा. तिनखेडा, ता. नरखेड) याला अंदाजे १० ते १२ वर्षांपासून ओळखतात. त्याच्या मालवाहू वाहनाला फुलगोबी मार्केटला नेण्याकरीता किरायाने सांगत असतात.

शेतकऱ्यांच्या मालाच्या पैश्यांची जबाबदारी संदीप यांच्याकडे असते. फुलगोबी दलालाकडे पोहचल्यानंतर दलाल संदीपकडेच पैसे देत असतात व ते पैसे संदीप शेतकऱ्यांना देतात. २८ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे रात्री भावेश मिनी ट्रान्स्पोर्ट दिंदरगांव परिसरातील शेतकऱ्यांची अंदाजे तीन टन ( १५८ कट्टे ) फुलकोबी अश्विन नासरेच्या मालवाहू वाहनात भरली.

त्याच्यासोबत इतर ठिकाणावरुन आलेली ५ वाहनेही दिवरगावला भाड्याने बोलावून घेतली. प्रत्येक गाडीत अंदाजे प्रती ३ टन माल भरून त्या मालाचे व्हाउचर दिंदरगांव ते गोंदिया असे देवून गोंदियाचे दलाल साखरे यांच्याकडे रवाना केले. संदीपने गोंदिया येथील दलाल साखरे, लालू यांना दिदरगाव येथून गाड्या रवाना झाल्याचे फोनवरुन कळविले.

अश्विन नासरे हा त्यांचे फुलकोबी भरलेले वाहन गोंदियाला न नेता दुसरीकडे घेवून गेला. अश्विनला संदीपने वारंवार फोन केले. परंतु त्याने त्याचा फोनसुद्धा उचलला नाही. म्हणून संदीपने २९ सप्टेंबरला बाकीच्या ५ वाहनवाल्यांसोबत संपर्क साधला. अश्विन हा वाहन घेऊन गोंदियाला आलाच नाही, असे त्यांच्याकडून कळले.

२९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरपर्यंत अश्विन यास संदीपने वारंवार पाठविलेल्या मालाबद्दल विचारले. तो व त्याचा मित्र नितीन येवतकर या दोघांनी तो माल नागपूरला विकला, असे चालक अश्विनने सांगितले.

संदीपने पैश्याबाबत विचारले तर पैसे न देता आम्हाला एकाने शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली, असे सांगून संदीपची बनवाबनदी केली. शेतकऱ्यांकडून घेतलेल्या फुलगोबीच्या पैश्यांसाठी वारंवार शेतकरी फोन करु लागले. त्यामुळे संदीपने सर्व ११ शेतकऱ्यांचे घेतलेल्या मालाचे पैसे परत केले. अश्विन याच्याविरुध्द पोलिसांत तक्रार केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.