नागपूर : माझी लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या बँक खात्यात राज्य सरकारकडून पैसे पाठवले जात आहेत. मात्र मेडिकलमधील कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी वित्त विभागाकडून महिना लोटून गेल्यानंतरही वेतनाचे अनुदान देण्यात आले नाही, ऑगस्टचे २२ दिवस उलटूनही कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही, यामुळे संतप्त झालेल्या मेडिकलमधील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांनी अधिष्ठाता कार्यालयासमोर गुरुवारी (ता.२२) धरणे आंदोलन केले.