Nagpur : आचारसंहितेच्या धसक्याने फायलींना आला वेग...अनेकांचा ‘गेम’ झाल्याची चर्चा

Nagpur : आचारसंहितेच्या लागू होण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेमध्ये फायलींना वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चुरशीची स्थिती असून, अनेकांना पदोन्नतीच्या फायलींवर सही करण्यात आले आहे.
Nagpur
Nagpur sakal
Updated on

नागपूर : विधानसभा निवडणुकीची आचार संहिता मंगळवारी लागण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यापासून जिल्हा परिषदेमध्ये लगबग सुरू आहे. बाबूपासून तर अधिकाऱ्यांपर्यंत सर्वच जण फायली निकाली काढण्यासाठी धावपळ करीत असल्याचे दृश्य पाहायला मिळत आहे. फायली निकाली काढताना अनेकांचा ‘गेम’ झाल्याची चर्चा आहे.

जिल्हा परिषदेतील कामांना गती मिळावी म्हणून सत्ताधारी पक्ष सध्या सक्रिय आहे. मात्र, विरोधक त्यांच्यावर भारी ठरत आहेत. गावागावांत मेळावे घेण्याच्या कार्यक्रमांना स्थगिती आणली. तर सत्ताधाऱ्यांनी हिंगणा, रामटेक आणि कामठी मतदारसंघातील कामांना नाहरकत प्रमाणपत्र नाकारून ‘ब्रेक’ लावला.

यामुळे त्यांच्यात धुसफूस सुरू आहे. तर प्रशासकीय पातळीवरही अधिकाऱ्यांनी फाइल निकाली काढण्याची ‘दौड’ सुरू केली. त्यांच्या ‘मॅरेथॉन दौड’ला नवीन सीईओंनी आवर घातला आहे. पदोन्नतीसारखे विषय मंजूर केले. मात्र, त्याच्यासाठीही अनेकांना चांगलाच कस लागला. फाइल वाचूनच निकाली काढू, असा दम सध्या तरी सीईओ विनायक महामुनी यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे.

खिसे गरम करण्याचा प्रकार सुरू

बांधकाम विभागातही कामाचे बिल काढण्यावरून खिसे गरम करण्याचा प्रकार सुरू आहेत. आचारसंहिता लागली दोन महिने बिलाचे पैसे निघणार नाही, त्यामुळे आत्ताच जुगाड कर आणि बिले काढ, असा सल्ला बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचारी देत आहेत. कंत्राटदारही जे मिळेल ते गोड मानून खिसे गरम करण्यावर भर देत आहेत. पाणी पुरवठा विभागातील कंत्राटदार मात्र, त्रस्त आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी अभिप्राय न दिल्याचे सांगून ८० लाखांची रक्कम काढण्यास नकार देत आहेत.

पदोन्नतीच्या फायलींवर झाली सही

जिल्हा परिषदेतील विविध विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या फायलींवर सीईओंनी सही केली. त्यांची यादी जाहीर झाली. यामुळे कर्मचारी सध्या तरी खूष दिसत आहेत. वेगवेगळ्या पक्षाचे पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघटना सीईओंना भेटून त्यांच्या मागण्यांवर चर्चा करीत आहेत. आचारसंहिता लागण्यापूर्वी ‘कामे’ आटोपली पाहिजे, यावर त्यांचा भर असल्याचे दिसून येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.