सकाळ वृत्तसेवा
नागपूर - क्रूड आणि रिफाइंड पाम तेल, सोयाबीन तेल आणि सनफ्लॉवर सीड तेल यांवर बेसिक कस्टम ड्युटी वाढवण्यात आली आहे. त्यामुळेच दिवाळीच्या तोंडावर खाद्य तेलाच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचा खिसा रिकामा झालेला आहे. दिवाळीतील या भाववाढीने अनेकांचे बजेट बिघडले आहे. असे असले तरी दिवाळीनंतर खाद्य तेलाच्या दरात प्रतिकिलो २०ते ३० रुपयांची घसरण होणार आहे.