मोठी बातमी! बच्चू कडूंना कारावास, अमरावतीच्या कोर्टाचा निर्णय

bachhu kadu reaction on farmer suicide in anjangaon surji of amravati
bachhu kadu reaction on farmer suicide in anjangaon surji of amravati
Updated on

शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संदर्भात मोठा निर्णय समोर आला आहे. त्यांना दोन महिन्यांचा कारावास आणि दंड ठोठावण्यात आला आहे. 2014 च्या एका प्रकरणात ही निर्णय आला आहे.

2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात बच्चू कडू यांनी मुंबईतील दोन फ्लॅट्सची माहिती लपवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. अमरावतीच्या चांदूरबाजार प्रथमवर्ग न्यायालयाने यासंदर्भात निर्णय दिला आहे. तुरुंगवासासोबतच २५, ००० रुपयांचा दंड त्यांना ठोठावण्यात आला आहे. (Bacchu Kadu Arrest)

२०१४ मध्ये कडूंनी अचलपूर मतदारसंघातून अर्ज भरला होता. यावेळी ते निवडूनही आले. मात्र, निवडणुकीसाठी उमेदवाराच्या शपथपत्रात त्यांनी मुंबईतील मालमत्तेची माहिती दिली नव्हती. चांदूरबाजारचे भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी आरोप केले होते. त्यासंबंधी तक्रारही दाखल करण्यात आली. २०१७ मध्ये ही तक्रार दाखल झाली होती.

अखेर चार वर्षांनी या प्रकरणाचा निकाल जाहीर झाला. लोकप्रतिनीधी कायद्यान्वये गुन्हा सिद्ध झाला असून बच्चू कडूंवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे कडू येणाऱ्या काळात उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याच दिसतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.