ऐका हो ऐका, येथे चारली जातात जनावरांना चक्‍क वांगी, वाचा काय आहे कारण....

कुही :  भाव नसल्यामुळे वांगी बैलाना चारताना डोंगरमौदा येथील शेतकरी.
कुही : भाव नसल्यामुळे वांगी बैलाना चारताना डोंगरमौदा येथील शेतकरी.
Updated on

कुही (जि.नागपूर):   मिरची व भाजीपाला उत्पादन काढणारे गाव म्हणून डोंगरमौदा या गावाची ओळख पूर्वीपासूनच आहे. मात्र, आता लाकडाउनच्या काळात जनावरांना चक्‍क वांगी चारण्याचा प्रकार प्रत्ययास आला. त्याचे कारण म्हणजे येथे वांगी मुबलक आहेत किंवा जनावरांचे ते खाद्य म्हणून चारली जातात असं नव्हे तर सदया स्थितीत बाजारात वांग्याचे मोल करायला कुणी तयार नसल्यामुळे शेतक-यांना ती आता जनावरांना चारण्याची वेळ आली आहे, काय म्हणावे याला!

लग्न, सामुदायिक कार्यक्रमावर बंदी, हे कारण
लग्न व इतर जास्त गर्दी होणा-या कार्यक्रमांवर बंदी असल्याने वांग्यांकडे कुणी ग्राहक ढुंकून पाहत नसल्याने डोंगरमौदा येथील लंकेश शेंदरे या शेतकऱ्याने दहा पोती वांगी जनावरांना चारली. डोंगरमौदा येथील शेतकरी दरवर्षी नवनवीन शेती तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतात. साधारणपणे एप्रिल, मे महिन्यात लग्नसराई असते. म्हणून यावेळी वांगी व इतर भाजीपाल्याची मागणी मोठ्या प्रमाणात असल्याने भावही चांगला मिळायचा. त्यामुळे एप्रिल व मे महिन्यात भाजीपाला उत्पादन बाजारात नेता येईल, या हिशेबाने शेतकरी पिकांची लागवड करतो.

वांग्यांना भाव तीन रूपये किलो !
लंकेश शेंदरे यांनी दिलेल्या माहितीनुसार चांगला भाव मिळाला तर दर आठवड्याला चार हजार रुपयांची वांगी विकली जायची. एप्रिलपासून साधारणतः ऑगस्ट महिन्यापर्यंत वांग्यांचे सिजन चालायचे. चांगला भाव मिळाला तर दीड ते दोन लाखांच्या आसपास उत्पन्न मिळायचे. मात्र, आता लाकडाउनमुळे लग्न व इतर जास्त गर्दी होणारे कार्यक्रमांवर बंदी असल्याने वांग्यांना उमरेड बाजारात तीन रुपये किलो दराने कुणी ग्राहक खरेदी करायला तयार नसल्याने दहा पोती वांगी जनावरांना चारली.
डोंगरमौदा, चिकणा, धामणा येथील जवळपास चारशे शेतकरी भाजीपाल्याची शेती करतात. आता सर्वांवर वांगी जनावरांना चारण्याची वाईट वेळ आली आहे.

शेतकऱ्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करा
लॉकडाउनमुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. बळीराजाला वाचविण्यासाठी शासनाने शेतकऱ्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावे तसेच नवीन हंगामासाठी खते, बी-बियाणे पुरवठा करावा.
-सुरेश नौकरकर
उपसरपंच, डोंगरमौदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.