नागपूर - कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालत अत्यावश्यक सेवेत स्वतःला झोकून देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रतिदिन ३०० रुपये कोविड भत्ता देण्याची घोषणा केली. यासंदर्भात हायकोर्टानेही आदेश दिले. पण एसटी महामंडळाने केवळ एका महिन्याचा प्रोत्साहन भत्ता दिला. अजूनही आठ महिन्यांचा भत्ता दिला नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष भडकला आहे.
कोरोना काळात संचारबंदी असताना नागपूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी)ने या कालावधीत कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवा देण्यासाठी नोटीस काढली होती. कोरोनाबाधितांना कोविड सेंटरमध्ये पोहचविताना जीवाची भीती होती. याचा विचार न कर्मचाऱ्यांनी कोरोना रुग्णसेवेला हातभार लावला. तसेच हजारो मजुरांना राज्याचा सीमेजवळ सोडण्याचे कार्य केले. कर्तव्य बजावत असताना अनेक एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे त्यांचे कुटुंबिय देखील धोक्यात आले. काहीना जीव गमवावा लागला.
मात्र, सेवाभाव निभावणारे एसटी कर्मचारी महामंडळाकडून मिळणाऱ्या ३०० रुपये प्रतिदिन प्रोत्साहन भत्त्यापासून वंचित आहेत. उच्च न्यायालयाने प्रोत्साहन भत्ता देण्याबाबत आदेश दिले आहेत. केवळ एप्रिल महिन्यात ३० दिवसांचा भत्ता देऊन कर्मचारी व अधिकाऱ्यांची बोळवण केली आहे.
एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक माधव काळे यांच्या स्वाक्षरीने प्रोत्साहन भत्यासंदर्भात २९ ऑक्टोबर २०२१ रोजी परिपत्रक काढले होते. त्यात ‘संचारबंदी कालावधीत प्रत्यक्ष कर्तव्य करणाऱ्या कर्मचारी व पर्यवेक्षकांना प्रतिदिन ३०० रुपये विशेष प्रोत्साहन भत्ता २३.०३.२०२० पासून संचारबंदी संपेपर्यंत अनुज्ञेय राहील, अशा स्पष्ट सूचना होत्या. संचारबंदी संपण्याची तारीख ३१.१२.२०२० अशी गृहीत धरली होती. इतर विभागात सर्व कर्मचाऱ्यांना भत्ता मिळत असताना नागपूर विभागातील कर्मचारी ८ महिन्याच्या भत्यापासून वंचित आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.