कामठी (जि.नागपूर) : तालुक्यात दर दिवसाला बधितांचा आकडा फुगत असताना कोरोनाच्या मृत्यूमध्ये दररोज वाढ होत आहे. आज पुन्हा एका ५४ वर्षीय महिलेचा व ६० वर्षीय पुरुषाचा मेयोमध्ये मृत्यू झाला. मागील पंधरा दिवसांपासून सतत एकामागे एक १८ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या मृत्यूची साखळी मात्र कायम आहे. तालुक्यात कोरोनाबाधीत रुग्णांनी सहाशेचा आकडा पार केला. मागील एक आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या उच्चांक गाठत असून आज पुन्हा तब्बल ६३ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली.
शहरासह आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोनाने हातपाय पसरल्यामुळे बाधीत रुग्णांची व मृतांची संख्या जलद गतीने वाढत आहे. गुमथळा येथील हल्दीराम कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या संख्येने बाधीत कामगार आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य प्रा. अवंतिका लेकुरवाळे यांनी केली आहे. आजपावेतो तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६७९ वर पोहोचली आहे. त्यातील २७४ रुग्णांनी कोरोनावर मात करून बरे झाले, तर अठरा रुग्ण दगावले असून ३८९ रुग्ण अॅक्टिव आहेत तर आज रॅपिड अँटीजेन चाचणी केलेल्या अनेकांचा अहवाल अजूनही प्रलंबित आहेत.
आज झालेल्या मृतांमध्ये ५४ वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरूष
रविवारी मिळालेल्या ६३ रुग्णांमध्ये शहरातील ४४, कामठी छावणी परीषद क्षेत्रातील दोन, ग्रामीण भागातील गुमथळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्वाधिक नऊ, येरखेडा चार, बिडबिना तीन व रनाळा येथे एक रुग्ण आढळला. रात्री उशीरा बाधीत रुग्णांची संख्या वाढली असल्याची माहिती मिळाली आहे. गुमथळा येथील हल्दीराम कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या संख्येने बाधीत कामगार आजूबाजूच्या गावात आढळून येत आहेत. यात परिसरातील गुमथळा, नेरी, भूगाव, उमरी, तरोडी येथील रुग्णांचा समावेश आहे. तर शहरातील ४४ रुग्णांमध्ये बजरंग पार्क चार तर कुंभारे कॉलोनी, जुनी खलाशी लाईन, प्रबुद्ध नगर, रमानगर येथील प्रत्येकी तीन तर इस्माईल पुरा, कसार ओली, पेरकीपुरा, दर्जी पुरा येथील प्रत्येकी दोन तर आनंद नगर, कामगार नगर, चंद्रमणी नगर, जयभीम नगर, ज्वालामाता मंदीर कलमना रोड, दाल ओली नं.१ व दाल ओली नं.२, नया गोदाम, तंबाखू ओली, निंबाजी आखाडा, पिली हवेली, फुटाणा ओली, पोलिस लाईन, बुनकर कॉलनी, मोदी पडाव, राठी हॉस्पिटल, रामगढ, राममंदिर मोंढा, सैलाब नगर, हमालपुरा येथील प्रत्येकी एका पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. आज पुन्हा दोन कोरोनाबाधीत रुग्णांचा नागपूरच्या इंदिरा गांधी मेयो रुग्णालयात मृत्यू झाला असून त्यात कामठी शहरातील बूनकर कॉलनी येथील एका ५४ वर्षीय महिलेसह पेरकीपुरा जे. एन. रोड येथील ६० वर्षीय इसमाचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी केली जनजागृती
मागील पंधरा दिवसांपासून सतत एकामागे एक अठरा जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या मृत्यूची साखळी मात्र कायम आहे. आज जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या परिसरात फिरून नागरिकांमध्ये जनजागृती केली. आज पॉझिटिव्ह मिळालेल्या या सर्व ‘हाय रिस्क’ रुग्णांना उपचारार्थ नागपूरच्या मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. ‘लो रिस्क’ रुग्णांना त्यांच्या निवासस्थानात गृहविलगीकरण करण्यात आले. त्यांचे निवासस्थान असलेला परिसर प्रतिबंधीत करण्यात आला असून रुग्णाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन नजीकच्या विविध विलीगीकरण कक्षात हलविण्यात आले. तर काहींची व्यवस्था नजीकच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत करण्यात येणार आहे. आजपावेतो तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६७९ वर पोहोचली आहे. त्यातील २७४ रुग्णांनी कोरोनावर मात करून बरे झालेत. अठरा रुग्ण दगावले असून ३८९ रुग्ण अॅक्टिव आहेत. आज रॅपिड अँटीजेन चाचणी केलेल्या अनेकांचा अहवाल अजूनही प्रलंबित आहेत.
संपादन : विजयकुमार राऊत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.