मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये, पूरस्थितीच्या पाहणीसाठी तातडीचा विदर्भ दौरा

Eknath Shinde and Devendra Fadnavis marathi news
Eknath Shinde and Devendra Fadnavis marathi newsEknath Shinde and Devendra Fadnavis marathi news
Updated on

नागपूर : गडचिरोलीसह (Gadchiroli) विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळेच पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. गडचिरोलीमध्ये तीन दिवसांचा रेड अलर्ट जारी केला आहे. पूर परिस्थितीची पाहणी आणि आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सोमवारी (ता. ११) गडचिरोलीला येणार आहे. (Eknath Shinde and Devendra Fadnavis marathi news)

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हा पहिला विदर्भ दौरा आहे. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे (Gadchiroli) पालकमंत्री होते. आता ते मुख्यमंत्री म्हणून गडचिरोलीचा दौरा करणार आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे मंत्रालयातून रवाना झाल्याची माहिती आहे. यामुळेच दुपारची एमएमआरडीएची बैठक रद्द करण्यात आली आहे.

Eknath Shinde and Devendra Fadnavis marathi news
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, शिवसेनेने केसेस मागे घ्यायला हव्या

मागील ४८ तासांपासून गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरू आहे. यामुळे नद्यांना पूर आला आहे. तर काही ठिकाणी झाडे आणि ट्रक वाहून जाण्याच्या घटना घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे लागू केलेल्या रेड अलर्टमध्ये सरकारी कार्यालये आणि अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व दुकाने आणि सेवा बंद राहणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोणत्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी अतिमहत्त्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावे, असे सांगण्यात आले आहे.

Eknath Shinde and Devendra Fadnavis marathi news
नागपूर : नाल्याच्या पुरात माय-लेकी गेल्या वाहून; आईचा मृतदेह सापडला

नदी, नाले व तलाव अशा ठिकाणी जाणे टाळा

गडचिरोली जिल्ह्यातील चपराळा येथे वर्धा व वैनगंगा नदीचे पाणी एकत्र येऊन प्राणहितामधून गोदावरी नदीला मिळते. तसेच मेडिगट्टा बॅरेजमधून आठ लाख क्यूसेक पाण्याचा विसर्ग ७५ दरवाजांमधून सुरू आहे. त्यामुळे नदीकाठी पडलेल्या पावसाचे पाणी सहज नदीत जात नाही. त्यामुळे लहान-मोठे सर्व नाले तुडुंब वाहत आहेत. कोरची तालुक्यात एकाच दिवसात १८६ मिलिमीटर पाऊस झाला. अहेरी तालुक्यातही काल २७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नागरिकांनी नदी, नाले व तलाव अशा ठिकाणी जाणे टाळावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.