Nagpur News : वैभवनगर अतिक्रमणधारकांना पट्टे कधी मिळणार?

आता याला पाच महिने झाले. पण, नियमामुकूल करणे तर दूर त्यावर चर्चा झाली नाही
Nagpur News : वैभवनगर अतिक्रमणधारकांना पट्टे कधी मिळणार?
Updated on

दीड महिन्यात देतो म्हणाले, झाले पाच महिने!

काळजी करून नका. दीड महिन्यात तुमचे अतिक्रमण नियमानुकूल करतो. स्टॅप पेपरवर प्रतिज्ञापत्र द्या, हे शब्द हे वानाडोंगरीच्या मुख्याधिकाऱ्यांचे. आता याला पाच महिने झाले. पण, नियमामुकूल करणे तर दूर त्यावर चर्चा झाली नाही. त्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये रोष आहे.

Nagpur News : वैभवनगर अतिक्रमणधारकांना पट्टे कधी मिळणार?
Nagpur News : सरकार ‘सिव्हिल लाइन्स’चेच आहे का?असा नागरिकांचा प्रश्न

वानाडोंगरी नगर परिषदेत अंतर्गत अतिक्रमण करून गेल्या अनेक वर्षांपासून रहिवासी असलेल्या कुटुंबांना पट्टे वाटप करण्याचा कार्यक्रम सरकारने आखला आहे. या अंतर्गत झोपडपट्टीधारकांना बांधकाम नियमानुकूल करून त्यांना हक्काचे पट्टे वाटप करण्यात येणार होते. वानाडोंगरी नगरपरिषदेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अतिक्रमण नियमानुकुल करण्याकरिता शंभर रुपयांच्या स्टँपपेपरवर अतिक्रमणधारकांना स्वयंघोषणापत्र लिहून संबंधित कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे सांगितले होते.

Nagpur News : वैभवनगर अतिक्रमणधारकांना पट्टे कधी मिळणार?
Nagpur: पारडी उड्डाणपुलाच्या खांबांवर झळकणार संतांची चित्रे

यासंदर्भात नागरिक मुख्याधिकाऱ्यांना भेटले होते. त्यांनी सर्व अतिक्रमणधारकांना एक ते दीड महिन्यात प्रक्रिया करून शासकीय पट्टे देतो,असे आश्वासन दिले होते. यावेळी ५० ते ६० अतिक्रमणधारकांना वानाडोंगरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांनी हे आश्वासन दिले. परंतु आज या घटनेला पाच महिने पूर्ण झाले. आपल्याला मालही हक्काचे पट्टे मिळतील या आशेत नागरिक आहेत. पण, मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्‍वासनाचे पुढे काय झाले हे कोणीही सांगायला तयार नाहीत.

या प्रकारामुळे अतिक्रमणधारकांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वानाडोंगरी नगरपरिषद कर्मचारी व संबंधित नगरसेवकांनी वैभवनगरवासीयांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अतिक्रमण नियमानुकुल करण्याकरिता शंभर रुपयांच्या स्टॅपपेपरवर स्वयंघोषणापत्र लिहून संबंधित दस्तवेजासह त्वरित वानाडोंगरी नगरपरिषद कार्यालयात अर्ज करायला सांगितले. २१ जून २०२३ ला मुख्याधिकारी भारत नंदनवार यांनी एक ते दीड महिन्यात पट्टे देण्याचे आश्वासन दिले. अतिक्रमणधारकांनी लवकरात लवकर अर्ज तयार करून कार्यालयात सादर केले.

२१ जूनला नगरपरिषद कार्यालयात झालेल्या बैठकीला मुख्याधिकारी भारत नंदनवार, उपाध्यक्ष कृपाशंकर गुप्ता, माजी सभापती चंदा अजमीरे सभापती आबा काळे, शिवसेना नेते विलास भोंबले, विनायक इंगळे, आशिष अजमीरे व ५० ते ६० अतिक्रमणधारक उपस्थित होते. अतिक्रमणधारकांना ५०० चौरस फुटापर्यंतच जागा शासकीय आदेशान्वये विनामूल्य मिळणार आहे.

Nagpur News : वैभवनगर अतिक्रमणधारकांना पट्टे कधी मिळणार?
Akola News : दुसऱ्यांदाही वाळू डेपोसाठी बोली लागेना; कंत्राटदार निरुत्साही

वानाडोंगरी नगरपरिषद बरखास्त झाल्यामुळे मुख्याधिकारी भारत नंदनवार हे आता प्रशासक आहेत. संबंधितांनी वारंवार मुख्याधिकारी नंदनवार व उपविभागीय अधिकारी मनोहर पोटे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता प्रत्येक वेळी पंधरा दिवसांचे आश्वासन मिळाले. एवढेच नव्हेतर २३ नोव्हेंबरला संबंधितांनी नागपूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाला भेट दिली. परंतु उपविभागीय अधिकारी कार्यालयात नसल्यामुळे भेट झाली नाही. शासकीय परिपत्रकामुळे इतर सर्वत्र पट्टेवाटप सुरू असताना वानाडोंगरी येथील अतिक्रमणधारकांना कधी मिळणार? हा एकमेव चर्चेचा विषय सुरू आहे.

जनतेचा झाला विश्वासघात

५० लोकांनी नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्यावर विश्वास ठेऊन अतिक्रमण नियमानुकुल करण्यासाठी अर्ज सादर केले. तर उर्वरित १५० लोकांनी अर्ज सादर करण्यासाठी नकार दिला. कारण वानाडोंगरी बसस्थानकावरील दुकानदारांचे अतिक्रमण बळजबरीने उद्‍ध्वस्त करण्यात आले. तेव्हा संबंधित यंत्रणेने त्वरित दखल घेऊन पट्टे वितरण करावे.अन्यथा अधिवेशनात आंदोलन करण्याचा इशारा अतिक्रमणधारकांनी दिलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.