रक्त पातळ करणारे इंजेक्शन संपले, तरीही प्रिक्स्रिप्शनवर लिहून देण्यास डॉक्टरांची टाळाटाळ

injection
injectiongoogle
Updated on

नागपूर : वाढत्या कोरोना रुग्णांमुळे रेमडेसिव्हिर (remdesivir) आणि फॅविपीरावीर औषधांचा काळाबाजार सुरू झाला. सर्वत्र रेमडेसिव्हिरची बोंबाबोंब सुरू असताना मेडिकलमध्ये रक्त पातळ करणारे ‘इनोक्स्यापॅरिन’ (enoxaparin injection) या इंजेक्शनचाही तुटवडा आहे. मागील पंधरा दिवसांपासून हे इंजेक्शन एकाही रुग्णाला लावण्यात आलेले नाही. रेमडेसिव्हिरसारखी बोंबाबोंब होऊ नये म्हणून रुग्णांच्या प्रीस्किप्शनवरही लिहून देण्याचे डॉक्टरांकडून टाळण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. (enoxaparin injection not avaialble in gmc nagpur)

injection
सतत मोबाईलच्या नादात न राहता चिमुकलींन जपला छंद; दगडातून साकारल्या सुंदर कलाकृती 

जिल्ह्यात मागील महिनाभर कोरोनाचा कहर होता. दररोजच्या बाधितांची संख्या सात हजारांवर पोहोचली होती. आरटीपीसीआर या कोरोना चाचणीपासून तर एचआरसीटी काढण्यासाठी रुग्णांची तोबा गर्दी होती. कोरोनाबाधितांची संख्या अचानक वाढल्याने मेयो, मेडिकल किंवा एम्समध्ये खाट मिळणे दुरापस्त झाले होते. औषधांचीही कमतरता जाणवू लागली. रेमडेसिव्हिर कोरोनासाठी जीवनरक्षक नाही. हे सर्वांना माहिती आहे. मात्र काही प्रमाणात का होईना लाभ होतो. यामुळे बाधितांचे जीव वाचवण्यासाठी रेमडेसिव्हिर खरेदीसाठी काळाबाजार सुरू झाला. जास्त डोजमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याची समस्या जाणवू लागली. यामुळे रक्त पातळ करण्यासाठी ‘इनोक्स्यापॅरिन’ हे इंजेक्शन लावण्यात येत होते. गरज असलेल्या बहुतांश रुग्णांना हे इंजेक्शन दिले जात होते. मात्र पंधरा दिवसांपासून या इंजेक्शनचा तुटवडा आहे. हे इंजेक्शन खरेदी करण्यासाठी प्रशासनाने अद्याप आदेश दिलेले नाही. मेडिकल प्रशासनाने देखील चुप्पी साधली आहे.

नागपूर व विदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा

सद्या मेडिकलमध्ये ७०० कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. यापैकी दीडशेहून अधिक व्यक्ती व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांना ‘इनोक्स्यापॅरिन’ इंजेक्शनची गरज आहे. मात्र, हे इंजेक्शन खरेदी विभागाने खरेदीच केले नाही. इंजेक्शन मिळत नसेल तर ‘डॉलटेपॅरिन’ हे पर्यायी इंजेक्शन आहे, मात्र तेसुद्धा मेडिकलच्या औषधालयात नसल्याची माहिती आहे. दररोज मेडिकलमध्ये सुमारे पन्नासपेक्षा अधिक रुग्णांना हे इंजेक्शन लावण्यात येत होते. मात्र आता इंजेक्शनचा साठा संपल्याने कुणालाच इंजेक्शन लावण्यात येत नाही. हीच स्थिती मेयोची असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी प्रशासनाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

काय आहे इनोक्स्यापॅरिन?

काही औषधांच्या जास्त डोसमुळे कोरोनारुग्णांमध्ये रक्ताच्या गाठी तयार होत असल्याचे पुढे आले. यामुळे बाधितांना ह्रदयविकाराचा धोका असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे रक्त पातळ करण्यासाठी मेडिकलमध्ये डॉक्टरांकडून ‘इनोक्स्यापॅरिन’ हे इंजेक्शन लावण्यात येत होते.

रक्त पातळ करणाऱ्या ‘इनोक्स्यापॅरिन’ इंजेक्शनची तसेच वॉर्डावॉर्डात व्हेंटिलेटर किंवा मोबाईल व्हेंटिलेटरऐवजी बायपॅक मशिनची मोठ्या प्रमाणात गरज आहे. ही अत्यावश्यक साधनसामुग्री खरेदी करण्याचे सोडून मेडिकल प्रशासनाने मोबाईल व्हेंटिलेटर खरेदीवर भर दिला आहे. आवश्यक असलेले ‘इनोक्स्यापॅरिन’ इंजेक्शन मेडिकल प्रशासनाने तत्काळ खरेदी करावे. यासंदर्भातील निवेदन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांना देण्यात येणार आहे.
-सिद्धांत पाटील, संयोजक, समता सैनिक दल, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.