फेसबुक फ्रेंड्सच्या प्रेमापोटी तरुणी निघाली राजस्थानला

sitabardi police
sitabardi policesitabardi police
Updated on

नागपूर : सोशल मीडियावरून प्रेमात (Love) पडलेल्या हिंगोलीच्या तरुणीने बॉयफ्रेंडला भेटायला राजस्थानला जाण्याचे (The young woman left for Rajasthan) ठरविले. तरुणीने बॅग भरली आणि थेट नागपूर गाठले. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे तरुणीला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. तरुणीला पोलिसांनी सुखरूप आई-वडिलांच्या ताब्यात दिले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील गावात राहणारी १८ वर्षीय तरुणीचे फेसबुकवरून (Facebook friend) राजस्थानमध्ये राहणाऱ्या युवकाशी ओळख झाली. काही दिवस चॅटिंग केल्यानंतर दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांचेही एकमेकांशी फोनवरून रोज बोलणे सुरू झाले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. युवकाने तिला लग्नाचे आमिष दाखवले आणि थेट राजस्थानला येण्याची ऑफर केली.

sitabardi police
अनुष्का सेन हिने शेअर केले बाथरूमचे फोटो; वय फक्त १९ वर्ष

मुलीने फेसबुक फ्रेंडच्या प्रेमापोटी घर सोडून राजस्थानला जाण्याचा निर्णय घेतला. त्याने तरुणीला काही पैसे सोबत घेऊन येण्यास सांगितले. पैसे असल्यास लग्न करून नव्याने संसार थाटता येईल, अशी गोडीगुलाबी तरुणीला लावली. त्याच्या प्रेमात वेडी झालेल्या तरुणी वडिलांचे पैसे चोरून प्रियकराकडे पळ काढण्याचे ठरविले.

तरुणीचे आईवडील शेतमजुरी करतात. शेतीत पिकवलेल्या सोयाबीनची वडिलांनी नुकताच विक्री केली होती. विक्रीतून आलेले ५२ हजार रुपये तिने घेतले आणि ४ डिसेंबरला हिंगोलीतून पळ काढला. ती दोन दिवस शाळेतील मैत्रिणीकडे राहिल्यानंतर ७ डिसेंबरला नागपूर गाठले. तोपर्यंत हिंगोली पोलिसांकडून मुलगी बेपत्ता असल्याची माहिती नागपूर पोलिसांना मिळाली.

sitabardi police
‘पहाट’ शपथेचा परिणाम; शिवसेना-काँग्रेस एकाच पंक्तीत

सीताबर्डीचे ठाणेदार अतुल सबनीस, निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय दिलीप चंदन यांच्या पथकाने मुंजे चौकातून तरुणीला ताब्यात घेतले. तिच्याकडून घरून आणलेले ५२ हजार रुपये जप्त केले आणि आई-वडिलांना नागपुरात बोलावून घेतले. पोलिसांनी तरुणीला आई-वडिलांच्या ताब्यात दिले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.