दुर्गम भागातील मुलांच्या चेहऱ्यावर हसू

एकत्र उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षणाची सुविधा; हजारो मुलांनी घेतला लाभ
Abhijeet khandagale News, Education News, Motivational News in Marathi, Inspiring story in Marathi
Abhijeet khandagale News, Education News, Motivational News in Marathi, Inspiring story in Marathi
Updated on

नागपूर - ऑनलाइन शिक्षणाचा जमाना असला तरी दुर्गम भागातील मुलांपर्यंत वेगवान इंटरनेटची सुविधा पोहोचू शकली नसल्याने ही मुले शिक्षणापासून वंचित राहतात. अशा मुलांसाठी शहरातील तरुण अभिजित खंडागळे याने ‘एकत्र’ नावाच्या उपक्रमातून दुर्गम भागातील शाळकरी मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले आहे. अगदी कमी स्पीडमधील इंटरनेटसह याचा वापर होऊ शकतो. अभिजित त्याच्या वृक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून उद्योजकता विकासाबाबत कार्यक्रमांचे आयोजन करतो.(Abhijeet khandagale News)

कोरोना काळात ग्रामिण भागात झालेला मुलांचे हाल पाहून हा उपक्रम हाती घ्यावा, अशी कल्पना त्याला या वृक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून सुचली. रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातून २०१३ साली मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेत, त्याने ‘स्टार्टअप’ सुरू केले. यानुसार ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाही किंवा इंटरनेटची सोय नाही असा परिसर शोधण्यास सुरवात केली. त्यांच्याकडे असलेल्या फोनवर ‘टेक्स्ट मेसेज’द्वारे शैक्षणिक आणि ‘फोन कॉलींग’च्या माध्यमातून वर्ग घेण्यास सुरवात केली.(Inspiring story in Marathi)

विशेष म्हणजे, एका फोनवरून ‘ग्रुप कॉलिंग’च्या माध्यमातून तब्बल दोनशे विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. अनेक कुटुंबांकडे स्मार्टफोन असले तरी, ऑनलाइन शिक्षणासाठी लागणारा ‘डाटा’ त्यांना पुरत नाही. त्यामुळे या समस्येवर अभिजितने उपाय शोधून काढला. त्याने अशा पालकांना परिसरातील ‘वायफाय’चा उपयोग करीत, त्यातून शैक्षणिक साहित्य ‘डाऊनलोड’ करण्यास सुरवात केली. त्यामुळे याचा उपयोग अभ्यासासाठी करण्यास विद्यार्थ्यांनी केली. आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना या माध्यमातून अभिजित खंडागळे याने १० जणांच्या मदतीने शिकविले आहे.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे अनुदान

अभिजितच्या या कार्याची दखल थेट ‘यु एन युथ सोल्यूशन रिपोर्ट’मध्ये घेण्यात आली. जगातील पहिल्या ५० यंग सोल्यूशन देण्याऱ्या ‘इनोव्हेटर्स’च्या फिचरमध्ये त्याचा समावेश करण्यात आला. त्यानंतर गुगल फॉर स्टार्टअपचा ‘सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स’ यावरती स्टार्टअप प्रोग्रॅममध्ये मेटॉंरिग करण्यात येत आहे. याशिवाय ‘डेलॉईट’ आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांच्यातर्फे चालविलेल्या वर्ल्डक्लास एज्युकेशन चॅलेंज याच्यातर्फे २५ हजार डॉलर (१९.८७ लाख)चे अनुदान देण्यात आले आहे.

‘एकत्र’चे वैशिष्ट्य

  • कमीत कमी इंटरनेटचा वापर

  • मेसेज, व्हाट्सअप, इमेल, व्हिडिओ, टेक्स्टसह उपलब्ध

  • एका क्लिकवर उपलब्ध

  • स्मार्टफोनशिवाय टेक्स्ट आणि ऑडिओ माध्यमातून उपलब्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.