धानला : मागील महिन्यात सततच्या पावसामुळे घरांच्या पडझडीसह पांदण रस्त्यांची दयनिय अवस्था झाली होती. यातच मांगली-तेली येथील इंगरी पांदणवरील पूल वाहून गेले होता. याबाबत निवेदनातून तहसीलदार मलिक विराणी यांना दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र शासन प्रसासनच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांना स्वः खर्चाने वर्गणीतून पांदण दुरुस्त करावी लागली. यामुळे या भागातील राजकीय नेते व प्रशासन निकामी असल्याचा आरोप परिसरातील नागरिक करत आहेत.
पूल वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा शेतीशी संबंध तुटलेला होता. त्यामुळे त्यांनी तहसीलदार मलिक विराणी यांना जि.प.कृषी सभापती यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. त्यावर कोणताही तोडगा निघाला नसल्याने व शेतात जायला होत असलेल्या त्रासामुळे परिसरातील शेतकरी यांनी एकत्र येऊन स्व-खर्चातून निधी गोळा करून या पांदणची दुरुस्ती केली. यावेळी विशेष सहकार्य जेसीबी मालक मोतीलाल साठवणे यांनी केले.
सोबतच परिसरातील शेतकरी नामदेव ठोंबरे, श्याम साठवणे, नीलाधर ठोंबरे, सहादेव साठवणे, सुनिल साठवणे, शंकर साठवणे, विठोबा सूर्यवंशी, गोवर्धन सूर्यवंशी आदी सर्व परिसरातील शेतकऱ्यांनी योगदान दिले. आमच्याकडून न चुकता शेतसारा वायदा घेतला जातो, मात्र आमच्या शेतात जाण्याचा रस्ता दुरुस्त केला जात नसल्याने शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली. याच ठिकाणी हा रस्ता एखाद्या कारखान्याचा असता तर नेत्यासहित अधिकारी यांनी रात्रभर जागे राहून रस्त्याची दुरुस्ती केली असती, मात्र आम्ही राबराब राबून यांच्या पोटाची भाकर पिकवतो तरी आमच्या अडचणीकडे दुरुलक्ष का? असाही सवाल यावेळी शेतकाऱ्यांनी उपस्थित केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.