हिंगणा एमआयडीसी (जि. नागपूर) : पावसाळा (rain and farmers) तोंडावर आला आहे. खरीप हंगामाची तयारी जोरात सुरू (Preparations for the kharif season are in full swing) आहे. लॉकडाउनमध्ये गुराचे बाजार बंद (Cattle market closed in lockdown) आहेत. शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसाठी हवा असलेला ‘ढवळ्या पवळ्या’ मिळत नाही. वानाडोंगरी येथे भरणारा दरवर्षीचा बैलबाजार बंद असल्याने शेतकरी अडचणीत सापडला (The farmer in trouble) आहे. बैलासाठी गावोगावचे शिवार पालथे घालत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. (Farmers-are-facing-increasing-difficulties-due-to-closure-of-bull-market)
खेड्यातील शेतकरी आजही पारंपरिक पद्धतीने शेती करतात. बोटावर मोजके मोठे शेतकरी शेतात मशागतीची कामे ट्रॅक्टरद्वारे उरकून घेतात. अल्पभूधारक शेतकरी आजही शेतातील काम ढवळ्या पवळ्याच्याच बळावर करतात. अशक्त झालेली बैलजोडी बाजारात विकून शेतकरी नवीन बैलजोडी खरेदी करतात व शेतशिवार फुलवितात.
आज डिझेलचे भावही वाढल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर न परवडणारा झाला आहे. अशावेळी बैल जोडीच त्याच्या कामात येते. त्यामुळे बैलबाजार अडेगाव, कान्होलीबारा, कवडस, वानाडोगरी या मोक्याच्या ठिकाणी शासनाने सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी हिंगणा तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.
दरवर्षी एप्रिल, मे, जून महिन्यात बैलबाजार भरत होते. त्यामुळे बैल खरेदीविक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात व्हायचे. मात्र, मागील वर्षापासून कोरोना असल्यामुळे याही बाजारांना लॉकडाउनचा फटका सहन करावा लागला. ट्रॅक्टर मशागतीचे भाव एकरी हजार रुपये इतका वाढला. त्यामुळे सर्वच शेतकरी अडचणीत सापडला आहे. शेत नांगरणे, वखरणे, पेरणी करणे, डवरणी अशी शेतातील कामे बैलजोडी शिवाय होत नाहीत. शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून असल्याने कृषी विभागाच्या देखरेखीखाली शासनाने बैल बाजारांना परवानगी देऊन शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढणे गरजेचे झाले आहे.
बैलाविना शेती कशी करावी?
आज ज्यांना बैल विकायचा आहे, त्यांना बैल घेणारा सापडत नाही. ज्यांना बैल घ्यायचा आहे त्यांना विक्री करणारा मिळत नाही. पण, आता पावसाळा अगदी जवळ आला आहे. बैलाविना शेती कशी करावी, असा प्रश्न उभा ठाकला आहे. याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
(Farmers-are-facing-increasing-difficulties-due-to-closure-of-bull-market)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.