पाच वर्षांच्या फरकाने वडिलांपाठोपाठ मुलाची आत्महत्या

well
wellwell
Updated on

जलालखेडा (जि. नागपूर) : नरखेड तालुक्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबत नाही. पुन्हा जलालखेडा येथील पोलिस ठाण्यांतर्गत रोहणा येथील २८ वर्षांच्या शेतकऱ्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

रोहणा येथील शेतकरी नंदकिशोर छत्रपती फुले (वय २८) हा नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी शेतात गेला होता. घरी परत न आल्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने शोध घेतला. त्याचे कपडे रोहना गावापासून चार किलोमीटर अंतरावर बांबल यांच्या शेतातील विहिरीजवळ आढळून आले. यानंतर त्याचा शोध विहिरीत घेतला असता मृतदेह आढळून आला.

well
नवीन नट्टू काका प्रेक्षकांच्या भेटीला! फोटो होतोय व्हायरल

मृतदेह बाहेर काढून पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. मृत शेतकरी फुले हा कर्जाच्या ओझाखाली दबलेला होता. त्यांच्या जवळ फक्त तीन एकर कोरडवाहू शेती आहे. ही शेती व मजुरी करून तो कुटुंबाचे पालनपोषण करीत होता. पाच वर्षांपासून निसर्गाच्या प्रकोपामुळे सततची नापिकी व वाढता कर्जाचा डोंगर सहन न झाल्याने त्याने जीवनच संपून टाकले. त्याच्या मागे आई, भाऊ असा आप्तपरिवार आहे.

पाच वर्षांपूर्वी वडिलांची आत्महत्या

आत्महत्या केलेल्या नंदकिशोर फुले याचे वडील छत्रपती फुले यांनी देखील पाच वर्षांपूर्वी १९ मार्च २०१६ ला रोहणा शिवारातील लीलाधर मोहोड यांच्या शेतातील विहिरीजवळ विष प्राशन करून आत्महत्या केली होती. आत्महत्याग्रस्त शेतकरी छत्रपती फुले यांच्यावर त्यावेळी जिल्हा बँक पारडसिंगाचे सत्तर हजार रुपये पिककर्ज होते. तसेच त्यांनी घर बनविण्यासाठी भारसिंगी येथील बँक ऑफ इंडिया येथून एक लाखाचे कर्ज घेतले होते. घराचे कर्ज पिकावर फेडण्याचा त्यांचा मानस होता. पण सततच्या नापिकीमुळे कर्जाचे हफ्ते थकले व कर्जाचे ओझे वाढत गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.