Nagpur Accident: भरधाव ट्रकने १२ वाहनांना चिरडलं; कार, दुचाकी अन् रूग्णवाहिकेचा चक्काचूर, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Nagpur Accident: नागपूरातील मानकापूर चौकामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 12 ते 13 चार चाकी गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
Nagpur Accident
Nagpur AccidentEsakal
Updated on

Nagpur Accident: नागपूरात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नागपूरच्या मानकापूर परिसरामध्ये भरधाव जाणाऱ्या ट्रकने 12 गाड्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये 9 कार, एक रुग्णवाहिका आणि दोन दुचाकी वाहनांचा समावेश आहे. या भीषण अपघातामध्ये एकूण चार जण जखमी झाले असल्याची माहिती नागपूर पोलिसांनी दिली आहे.

नागपूरातील मानकापूर चौकामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 12 ते 13 चार चाकी गाड्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. उड्डाण पुलावरून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने सिग्नलवर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिली. या धडकेत सुमारे पाच ते सहापेक्षा जास्त कारचं नुकसान झालं.

Nagpur Accident
जन्म दाखला कसा काढतात? इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी 31 डिसेंबरपर्यंत 6 वर्षे पूर्ण आवश्यक; ‘RTE’तील 25 टक्के सोडून 75 टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी मान्यता

अपघातग्रस्त कारमधील प्रवाशांना दुखापत झाली आहे. अपघातग्रस्त प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. अपघात इतका भीषण होता की, एक कार दुसऱ्या कारवर चढल्यामुळे कारचा चेंदामेंदा झाला. अपघातामुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. भीषण अपघातानंतर वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला होता.

Nagpur Accident
निवडणूक काळात ट्रॅव्हल्स, टॅंकर, दूध-भाजीपाल्याच्या वाहनांवर लक्ष! जिल्ह्याच्या सीमेवर पोलिस व ‘एक्साईज’चे 15 चेकपोस्ट; 40,000 वाहनांची तपासणी

चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्यामुळे तो समोर लाल सिग्नल असल्यामुळे थांबलेल्या वाहनांवर मागून धडकला. या कंटेनरने अगोदर एका कारला धडक दिली. त्यानंतर काही कार, दुचाकी यासोबत फरफटत गेल्या. यामध्ये एक दुचाकी कंटेनरखाली चिरडली गेली. या अपघातात सिग्नलला थांबलेल्या रुग्णवाहिकेचेही मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातात आतापर्यंत चारजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. माहिती मिळताच तातडीने मानकापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत या घटनेत कोणाचाही मृत्यू झाल्याची माहिती नाही.

Nagpur Accident
Thane Loksabha : ठाण्याचा नकाशा घेऊन आनंद दिघे भर दुपारी 'मातोश्री'वर पोहोचले अन्...; भाजपचा मतदारसंघ शिवसेनेला कसा मिळाला?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.