रामटेक/नगरधन (जि.नागपूर) : आठव्या वर्गात शिकणारा प्रिंस. दिसायला अतिशय सुंदर, अभ्यासाव्यतिरिक्त सतत मोबाईल हातात. उठता बसता मोबाईलवरील "गेम' खेळण्याचा त्याला छंद लागला. मोबाईलशिवाय क्षणभरही राहणे त्याला जमत नव्हते. सतत मोबाईल खेळत असल्यामुळे वडील रागावले. म्हणून तेरा वर्षीय प्रिंसने मात्र त्याच्या वयाला न शोभणारे कृत्य केले. त्याच्या या दुर्दैवी कृत्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक वाचा : मोबाईलच्या कारणावरून आई रागावल्याने मुलाची आत्महत्या...
प्रिंस जिद्दी स्वभावाचा
प्रिन्स रविंन्द्र खानकुळे (वय13) हा वर्ग आठवीत इंदिरा गांधी विद्यालयात शिकत होता. प्रिन्सला मोबाईल "गेम' खेळायचा छंद होता. तो रोज मोबाईल "गेम' खेळायचा. त्याला वडील मोबाईल खेळण्यावरुन रागवत होते. पण प्रिन्स हा जिद्दी स्वभावाचा असल्यामुळे वडीलांनी मोबाईल खेळू दिले नसल्याच्या कारणावरून बुधवारी सकाळी आई वडील शेतात शेतकाम करायला गेले असताना प्रिन्सने घराच्या छताला गळफास लावून आत्महत्या केली.
अधिक वाचा :आता प्रवाशांना बेड रोल, कोरोना प्रतिबंधक किटही, या स्थानकावर केली सुविधा...
ही एक शोकांतिकाच !
केवळ वडील रागावल्यावरून एवढया छोट्या वयात मुलाच्या मनात आसा विचार येणे आणि त्याने जीवघेणे पाऊल उचलणे ही शोकांतिका असल्याची बाब चर्चेत ऐकावयास मिळत आहे. त्याने इतक्या टोकाचा पाउल घेतल्याने संपूर्ण परिसरात दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस ठाण्यात माहिती मिळताच रामटेक पोलिस ठाण्याचे निरिक्षक दिलीप ठाकूर यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीकरीता उपजिल्हा रुग्णालय येथे पाठविला. आकस्मिक मृत्युची नोंद घेण्यात आलीअसून पुढील तपास रामटेक पोलिस करीत आहेत.
हेही वाचा : तुम्ही नव्हे तर पब्जी खेळतोय तुमच्या जीवाशी, नागपुरात उघडकीस आली ही घटना...
मैदानी खेळासाठी प्रोत्साहित करावे !
मुलांविषयी वाटणा-या कौतुकामुळे आईवडील मुलांना मोबईल देतात आणि त्यामुळे मुलांना त्याचा छंद लागतो. त्यांना जर मोबईल नाही मिळाला की ते चिडचिड करतात. पालकांनी मुलांना मोबाईलपासून लांब ठेऊन त्यांना मैदानी खेळासाठी प्रोत्साहित करावे. त्यांना मानसिक आणि शारीरिकदृष्टया सुदृढ बनवावे.
दिलीप ठाकूर
पोलिस निरिक्षक
रामटेक
संपादन
विजयकुमार राऊत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.