तुकाराम मुंढे जाताच अधिकाऱ्यांवरच धाक संपला; बदल्यांमध्ये मनपाचे ‘फॅमिली प्लॅनिंग'

fear on the officers ended; Corporation's 'Family Planning' in transfers
fear on the officers ended; Corporation's 'Family Planning' in transfers
Updated on

नागपूर  : शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पती-पत्नी एकत्रीकरण कायदा राज्यात लागू आहे. मात्र, महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने त्याही पुढचा निर्णय घेत एकच शहर आणि एकाच संस्थेत कार्यरत असलेल्या नवरा-बायकोला एकाच विभागात बदली दिली. त्यामुळे टाऊन प्लॅनिंग विभागात झालेल्या या फॅमिली प्लॅनिंगची चांगलीच चर्चा सध्या महापालिकेच्या वर्तुळात आहे.

तुकाराम मुंढे जाताच महापालिकेतील अधिकाऱ्यांवरच धाक संपला असून, अलीकडे झालेल्या बदल्यांमध्ये मोठा घोळ झाल्याची चर्चा सुरू आहे. नगररचना विभागाचे सहायक संचालकांनी आपल्या अखत्यारीत असलेल्या काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केला. त्या करताना कुठलेही तारतम्य बाळगल्या दिसून येत नाही. 

कनिष्ठ अभियंता असलेल्या पत्नीच्या हाताखाली स्थापत्य अभियांत्रिकी सहायक म्हणून नवऱ्याची नियुक्ती केली. विशेष म्हणजे डॉ. गंटावार दांपत्यांच्या एकाच विभागातील नियुक्तीवरून महापालिकेच्या सभागृहात पदाधिकाऱ्यांनी चांगलाच गदारोळ केला होता.

कर्मचारी उतावीळ

तीन वर्षांतून एकदा बदली करण्याचा महापालिकेत नियम आहे. त्यानुसार अनेक वर्षांपासून एकाच टेबलवर असलेल्या सुमारे पन्नास ते साठ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. १० सप्टेंबरला बदल्यांचा आदेश निघाला. आवडत्या टाऊन प्लॅनिंग विभागात नियुक्ती मिळालेले कर्मचारी त्यामुळे एकदम खूष झालेत. त्यांनी हातात बदलीचे पत्र यायच्या आधीच काही उतावीळ कर्मचारी टाऊन प्लॅनिंगमध्ये दाखलही झाल्याचे समजते. एरवी कामे टाळणारे कर्मचारी टाऊन प्लॅनिंगमध्ये रुजू होताना इतके उत्साही का? हे सांगण्याची कोणाला गरज नाही.

दोघेही होम क्वारंटाईन

टाऊन प्लॅनिंगमध्ये नियुक्त झालेले नवरा-बायको सध्या कोरोनामुळे गृह विलगीकरणात आहेत. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला कोरोना झाला आहे. त्यामुळे त्यांच्या अखत्यारीत येणारे काम आणखी काही दिवस ठप्पच राहणार आहे.

वचपा की बदली?

मुंढे महापालिकेचे आयुक्त असताना नगररचना विभागाचे सहायक संचालक यांनी भाजपच्या एका आमदारावर शिवीगाळ व धमकी दिल्याचा आरोप केला होता. त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. पुढे हे प्रकरण थंड बस्त्यात गेले. याचा वचपा म्हणून महाल परिसराशी संबंधित असलेल्या कर्मचाऱ्यांना टाऊन प्लॅनिंग विभागातून हालवण्यात आल्याची जोरदार चर्चा आहे. 

संपादन  : अतुल मांगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.