फेब्रुवारी महिना ‘मर्डर फ्री’; नागपूर शहरात एकही खून नाही

Murder case
Murder caseMurder case
Updated on

नागपूर : ‘क्राईम कॅपिटल’ (Crime Capital) अशी ओळख असलेल्या नागपूर शहरासाठी फेब्रुवारी महिना सुखद धक्का देणारा ठरला. कारण, या महिन्यात शहरात एकही खून झाला नसल्याने क्राईम सिटीची ओळख पुसली जाईल का? अशी सकारात्मक चर्चा रंगू लागली आहे. नागरिकांसाठी ही आनंदाची बाब आहे. शहरात २४ तासांच दोन-दोन खून झाल्याच्या घटना पूर्वी घडल्या आहेत. शहर पोलिसांच्या सतर्कतेने तसेच गुन्हेगारी तपास, विविध मोहिमा राबवून गुन्हेगारांवर पोलिसांनी वचक निर्माण केला आहे. त्यामुळेच फेब्रुवारी महिना ‘मर्डर फ्री’ झाल्याचे बोलले जात आहे.

शहराला गुन्हेगारी मुक्त व सुरक्षित शहर करण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी विविध उपाययोजना राबविल्या. वस्त्यांमध्ये रुट मार्च काढणे, गुन्ह्यांची तत्काळ दखल घेणे, त्याचा छडा लावणे, आरोपीला त्वरित जेरबंद करणे, रात्रीला गस्त वाढविणे आदी उपक्रम राबवून शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. या प्रयत्नाला अखेर यश आले आहे.

Murder case
८० वर्षीय वृद्धाने घेतली अग्निसमाधी; रात्रभर घेतला नाटकाचा आनंद

नॅशनल क्राईम रेकॉर्डच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक हत्या होत असलेल्या शहरांमध्ये नागपूरचे नाव आघाडीवर होते. त्यातच काही महिन्यांपूर्वी नागपूर शहरात हत्याकांडाच्या काही घटना समोर आल्या. या घटनेमुळे पोलिसांच्या (Police) कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करण्यात आले होते. यानंतर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील पाचही झोनचे पोलिस उपायुक्त, गुन्हे शाखेला त्यांच्या हद्दीतील गुन्हेगारी व्यक्तींवर नजर ठेवण्याचे आदेश दिले होते. पोलिस आयुक्तांनी केलेल्या विशेष प्रयत्नांना आता काही प्रमाणात यश येताना दिसत आहे.

गुन्हेगारांमध्ये वचक बसल्याने गुन्हे कमी

नागपूर पोलिसांनी फूट पेट्रोलिंग, बिट मार्शल सक्षमीकरण, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेची टीम तैनात करून गुन्हेगारांवर आणि हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. सोबतच महिलांवर होत असलेले अत्याचार रोखण्यासाठी दामिनी पथक सक्रिय होते. दामिनी पथकामार्फत महिलांच्या सुरक्षेवरही भर देण्यात आला. गुन्हेगारांमध्ये वचक बसल्याने शहरात गुन्हे कमी झालेत. त्यामुळेच फेब्रुवारी महिन्यात एकही खून झाला नसल्याचे पुढे आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.