लग्नाची वरात पडली महागात! ५० हजारांचा दंड; वऱ्हाड्यांची कोरोना चाचणी करण्याची नोटीस

लग्नाची वरात पडली महागात! ५० हजारांचा दंड; वऱ्हाड्यांची कोरोना चाचणी करण्याची नोटीस
PASIEKA
Updated on

नागपूर : कोरोना मार्गदर्शक (Corona Rules) तुडवीत दोनशेवर नागरिकांना निमंत्रित करून लग्न समारंभ करणाऱ्या नवरदेवावर महापालिकेने ५० हजाराचा दंड ठोठावला. एवढेच नव्हे तर लग्नात उपस्थित सर्व वऱ्हाडी मंडळींची सोमवारी कोरोना चाचणी करण्यासंदर्भात झोन सहायक आयुक्तांनी नवरदेवाला नोटीस बजावली. (Fine 0f 50 thousands to marriage ceremony in Nagpur)

लग्नाची वरात पडली महागात! ५० हजारांचा दंड; वऱ्हाड्यांची कोरोना चाचणी करण्याची नोटीस
'वाझे प्रकरणाची सर्व सूत्रे हलत होती परमबीर सिंग यांच्याच कार्यालयातून'; समोर आली धक्कादायक माहिती

आता मनपा लग्नात सहभागी सर्व वऱ्हाड्यांची कोरोना आरटीपीसीआर व अँटिजेन चाचणी करणार आहे. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या आदेशानुसार झोनचे सहायक आयुक्त विजय हुमने यांनी राजेश समुद्रे यांना नोटीस दिली. सोमवारी १० मे रोजी लग्न समारंभात उपस्थित सर्व वऱ्हाडी, शेजारी, पाहुणे या सर्वांची मनपाच्या मोबाईल चाचणी केंद्रावरून कोरोना चाचणी केली जाणार आहे.

लग्नाची वरात पडली महागात! ५० हजारांचा दंड; वऱ्हाड्यांची कोरोना चाचणी करण्याची नोटीस
अखेर उपराजधानीच्या जीवात आला जीव! तब्बल १६९ मेट्रिक टन प्राणवायूचा पुरवठा

विशेष म्हणजे नागपूर शहरातील ही पहिलीच कारवाई आहे. शहरात कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता सुरक्षेच्या दृष्टीने लग्न समारंभात सहभागी सर्व व्यक्तींची कोरोना चाचणी करण्याचा मनपाने निर्णय घेतला. सोमवारी १० मे रोजी सकाळी ९ वाजता लग्न समारंभ आयोजकांच्या घराजवळ मनपाच्या मोबाईल चाचणी केंद्रावर सर्वांची आरटीपीसीआर व अँटिजेन चाचणी केली जाणार आहे.

(Fine 0f 50 thousands to marriage ceremony in Nagpur)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()