असा लागला ‘फटाका बंदूक’चा शोध; शेतकऱ्यांची सुटली समस्या

असा लागला ‘फटाका बंदूक’चा शोध; शेतकऱ्यांची सुटली समस्या
Updated on

नागपूर : शेतकरी (Farmers news) मोठ्या कष्टाने पीक घेतात. दिवस-रात्र राबल्यानंतर त्यांच्या मेहनतीला फळ येते आणि शेतात डौलदार पीक उभे राहते. हे पीक पाहून बळीराजा समाधानी होतो. मात्र, यानंतरच खरी डोकेदुखी सुरू होते. पिकांना कीड लागण्यापासून वन्यप्राण्यांचा त्रासाला सामोरे जावे लागते. यामुळे पिकांची नासाडी होऊन (Destruction of crops from wildlife) शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. वन्यप्राण्यांपासून शेत पिकांचे होणारे नुकसान रोखण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जातात. यातून सुटका मिळवण्यासाठी गॅस वेल्डिंगचा व्यवसाय करणाऱ्याने सायलेन्सरपासून चक्क बंदूक (Gun from silencer) तयार केली. यामुळे शेतकऱ्यांची मोठी समस्या सुटली आहे. (Firecracker-gun-made-from-silencer)

वन्यप्राण्यापासून पिकांचे होणारे नुकसान ही काही नवीन आहे. ही समस्या आजचीही नाही. शेतात पीक उभे झाल्यानंतर या त्रासाचा शेतकऱ्यांना सामना करावा लागतो. ऊन, पावसात राबत शेतकरी पीक घेतात. यासाठी आपल्या जवळची जमापुंजी खर्च करतात. आलेल्या पिकातून नफ्याचा आशा तो बाळगून असतो. मात्र, याच पिकांवर वन्यप्राणी, पक्षी, किडे हल्ला चळवतात आणि नुकसान करतात.

असा लागला ‘फटाका बंदूक’चा शोध; शेतकऱ्यांची सुटली समस्या
नागपूर पोलिसांची प्रतिमा होताहे मलीन! विधवेवर बलात्कार

उभ्या पिकांमध्ये वन्यप्राण्यांनी प्रवेश करून नुकसान केल्याचे आपण अनेकदा ऐकले आहे. यासाठी शेतकरी सभोवताली कुंपण टाकण्यापासून तर बुजगावण्याचा प्रयोग करतात. मात्र, वन्यप्राण्यांचा त्रास काही कमी होत नाही. हीच समस्या ऐकून गॅस वेल्डिंगचा व्यवसाय करणारे श्रीकांत कानफाडे यांनी सायलेन्सरपासून बंदूक तयार केली आहे. या बंदुकीच्या आवाजाने वन्यप्राणी शेतातून पळून जातात.

पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी रोज फटाके फोडतात. फटाक्यांच्या आवाजाने जनावरे दूर राहतात. हे त्रासदायक काम आहे. यामुळे वेळ, पैसा वाया जातोच. शिवाय ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण होत असते. याला सायलेन्सरपासून तयार केलेली बंदूक चांगला पर्याय आहे. बाजारात पाइपच्या हलक्‍या बंदुकी आल्या आहेत. परंतु, त्या धोकादायक ठरण्याची शक्‍यता लक्षात घेता या दणकटच बंदुका तयार करीत असल्याचे असे श्रीकांत कानफाडे यांनी सांगितले.

असा लागला बंदुकीचा शोध

एकदा श्रीकांत कानफाडे गॅस वेल्डिंगने दुचाकीचे सायलेन्सर दुरुस्त करीत होते. या दरम्यान मोठ्याने आवाज झाला. आजूबाजूच्या लोकांनी कसला आवाज झाला म्हणून विचारपूस केली. त्यांनी झालेला प्रकार सांगितल्यानंतर सर्व परत गेले. काही वेळांनी एका शेतकऱ्याने विचारपूस केली. ‘तुम्ही केलेल्या आवाजामुळे शेतातील वन्यप्राणी पळून गेले. कशाने तो आवाज झाला हे सांगाल का?’ यातून बंदूक तयार करण्याची संकल्पना कानफाडे यांना सुचली. वेगवेगळे प्रयोग व भंगारातून गोळा केलेल्या साहित्यांचा वापर करून ही बंदूक तयार करण्यात आली.

असा लागला ‘फटाका बंदूक’चा शोध; शेतकऱ्यांची सुटली समस्या
निंदनीय! पतीने परवानगी दिल्याने दिराने केला वहिनीवर बलात्कार
पिकांच्या संरक्षणासाठी इलेक्‍ट्रिक वायरचे कुंपण लावले जाते. यामुळे प्राण्यांसह नागरिकांच्या जिवाला मोठा धोका असतो. याला पर्याय म्हणून आवाज करणाऱ्या ‘फटाका बंदूक’ची निर्मिती केली. बंदुकीने मोठा आवाज होतो; मात्र, इजा होत नाही. आजवर एक हजार बंदूक विक्री केल्या आहेत. शेतकऱ्यांची समस्या सुटल्याने आनंद होत आहे.
- श्रीकांत कानफाडे

(Firecracker-gun-made-from-silencer)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.