Nagpur News : नागपूरमधून पहिल्या १५५ एमएम शेलची खेप रवाना

ओएफएजेसाठी या नव्या आर्थिक वर्षासाठी ही एक आशादायक सुरवात मानल्या जात असून जागतिक संरक्षण बाजारपेठेमध्ये पाय रोवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
First consignment of 155 mm shells left from Nagpur
First consignment of 155 mm shells left from NagpurSakal
Updated on

नागपूर : अंबाझरीतील आयुध निर्माण कारखान्यातील (ओएफएजे) यंत्र इंडिया लिमिटेड कंपनीने (वायआयएल) १५५ एमएमची एम १०७ शेलची (कवच) पहिल्यांदाच निर्मिती करीत महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला आहे.

नुकतीच याची पहिली खेप कंपनीतून रवाना करण्यात आली आहे. ओएफएजेसाठी या नव्या आर्थिक वर्षासाठी ही एक आशादायक सुरवात मानल्या जात असून जागतिक संरक्षण बाजारपेठेमध्ये पाय रोवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

बोफोर्स सारख्या हॉवित्झरमध्ये (क्षेपणास्त्र) १५५ मिमी शेल वापरले जातात. ते ६.१ इंच व्यासाचे व सुमारे १०० पौंड वजनाचे आणि सुमारे २ फूट लांब आहेत. याची निर्मिती पूर्ण करून ही पहिली खेप पाठवण्यापर्यंतच्या यशस्वी प्रक्रियेचे श्रेय ओएफएजेचे कार्यकारी संचालक अंजन मिश्रा यांच्या दूरदर्शी नेतृत्वाला जाते.

निर्यातीची ही खेप देशातील महत्त्वाच्या आयुध निर्माण कारखान्यांपैकी एक असलेल्या वायआयएलसाठी एक मोठे पाऊल आहे. तर, कारखान्यामधील संपूर्ण निर्मिती संघाला या कामगिरीचा प्रचंड अभिमान असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

१५५ एमएमची एम १०७ शेल निर्मिती म्हणजे भारताच्या संरक्षण क्षेत्रातील वाढत्या पराक्रमावर आणि भारताच्या संरक्षण निर्यातीतील योगदान देण्याच्या कटीबद्धतेवर टाकलेला प्रकाश आहे. या पहिल्या यशस्वी निर्मितीमुळे भविष्यातील निर्यात प्रकल्प मोकळे झाले असून आंतरराष्ट्रीय संरक्षण बाजारपेठेतील प्रमुख दावेदार म्हणून कंपनीचे स्थान अधिक मजबूत झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.