नागपूर : विघ्नहर्ताच्या पाठोपाठ आगमन होत असलेली महालक्ष्मी अर्थात ज्येष्ठ गौरी आणि कनिष्ठ गौरीच्या स्वागताची घराघरांत लगबग सुरू झाली आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर फुलबाजारही चांगलाच बहरला. फुलहारांच्या दरवाढीने भाविकांचा खिसा हलका होत असून विक्रेत्यांची भरघोत कमाई होत आहे, तर सामान्यांना आर्थिक फटका बसत आहे.
गणपती आणि महालक्ष्मीच्या काळात फुलांच्या हारांना मोठी मागणी असते. पावसामुळे ऐनवेळी बाजारात फुले कमी आली तर तारांबळ नको आणि गर्दी टाळण्यासाठी अनेक ग्राहकांनी फुलवाल्यांकडे आठ दिवसांपूर्वीच ऑर्डर देऊन ठेवली होती. महालक्ष्मीसाठीचे खास हार बाजारात दोन हजार ते सहा हजार रुपयांपर्यंत आहे.