Sunil Kedar : माजी मंत्री सुनील केदार यांनी लावली विधानसभेसाठी फिल्डिंग; शिक्षेवरील स्थगितीसाठी उच्च न्यायालयात अर्ज

एनडीसीसी बँक घोटाळा प्रकरणात दोषी आढळल्याने २२ डिसेंबर २०२३ रोजी न्यायालयाने केदार यांच्यासह सहा जणांना पाच वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला होता.
former minister sunil kedar fielding for assembly application to high court for stay of sentence
former minister sunil kedar fielding for assembly application to high court for stay of sentence sakal
Updated on

नागपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (एनडीसीसी) घोटाळा प्रकरणात झालेल्या शिक्षेला स्थगिती मिळावी या विनंतीसह माजी मंत्री सुनील केदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने राज्य शासनाला नोटीस बजावली असून यावर उन्हाळी अवकाशानंतर सुनावणी अपेक्षित आहे. शिक्षेला स्थगिती मिळाल्यास केदारांचा विधानसभा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

या प्रकरणावर न्यायमूर्ती ऊर्मिला जोशी-फलके यांच्या समक्ष सुनावणी झाली. एनडीसीसी बँक घोटाळा प्रकरणात दोषी आढळल्याने २२ डिसेंबर २०२३ रोजी न्यायालयाने केदार यांच्यासह सहा जणांना पाच वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला होता.

यामुळे केदार यांची आमदारकी रद्द झाली आहे. त्यांना पुढील सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही. मात्र, आता ७ मे रोजी त्यांनी शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून अर्ज केला आहे. शिक्षेला स्थगिती मिळाल्यास त्यांना आमदारकी परत मिळून ते निवडणूकही लढू शकतील. यंदा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुकीची शक्यता आहे.

राज्य शासनाला मागविले उत्तर

शिक्षा सुनावल्यानंतर सुरुवातीला केदारांनी सत्र न्यायालयात शिक्षेच्या स्थगितीसाठी व जामिनासाठी अर्ज केला होता. तो सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांची जामिनावर सुटका केली होती. पुढे सर्वच आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. आता सुमारे पाच महिन्यांच्या कालावधीनंतर केदार यांनी शिक्षेच्या स्थगितीसाठी अर्ज केला आहे. न्यायालयाने या प्रकरणात राज्य शासनाला नोटीस बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.