नागपूर : दिवसेंदिवस देशात कोरोनाचे रुग्ण वाढतच आहे. नागपूरही यापासून आता दूर नाही. रविवारी सकाळी दोन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर दुपारी आणखी 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण शहरात आढळून आले. यामुळे एकाच दिवशी उपराजधानीत 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. आता एकट्या नागपुरात 41 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
जगासह देशात कोरोना विषाणूचे रुग्ण वाढत असताना देशाची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरात रुग्ण कमी होते. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येत असून, देशातील लॉकडाउनही वाढविण्यात आला आहे. मात्र, रुग्णांची संख्या वाढतच आहेत. गुरुवारी एकाच दिवशी सहा रुग्ण आढळल्यामुळे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे. यानंतर प्रशासनाने रात्रीच युद्धपातळीवर मोहीम हाती घेत उपाययोजनेला सुरुवात केली होती. याअंतर्गत सतरंजीपुरा भागातील रुग्णाच्या रहिवास क्षेत्रातील बडीमशीद आणि त्याला लागून असलेल्या मस्कासाथचा भाग सील केला होता.
आता रविवारी (ता. 12) शहरात चक्क 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे प्रशासन आणि नागपूरकरांच्या चिंतेते चांगलीच वाढ झाली आहे. सहा रुग्ण मेयोमध्ये दाखल करण्यात आले आहेत. ते मरकज येऊन आले होते. तर 8 रुग्णांवर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. हे रुग्ण खामलामध्ये आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात आले होते. एकमेकांच्या संपर्कात आल्याने रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावरून नागपुरात सामुदायिक प्रादुर्भाव होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
सामुदायिक प्रादुर्भावाचा मोठा धोका
दिल्लीतील मरकजहून आलेल्या तबलिकींना तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना आमदार निवास येथे ठेवण्यात आले आहेत. त्यांचा संसर्ग पसरू नये म्हणून वेगवेगळ्या कक्षात ठेवले होते. मात्र, आज सर्व नागरिकांनी एकत्र येत आंदोलन केले. यामुळे सामुदायिक प्रादुर्भाव वाढण्याचा धोका बळावला आहे.
मेयोमध्ये कोरोना विषाणूची चाचणी करण्याची सोय आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी येथील एक तपासणी यंत्र बंद पडले होते. यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल मिळण्यास उशीर झाला. यामुळे संबंधित रुग्णांना एमएलए होस्टलमध्ये ठेवले होते. एकमेकांच्या संपर्कात आल्याने नागपुरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही लॅब बंद पडली नसती तर इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढली नसती.
सतरंजीपुरा येथे कोरोनाची लागण झाल्याने रविवारी एका मृत्यू झाला होता. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आलेल्या एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी मध्यरात्री स्पष्ट झाले होते. यामुळे एकट्या नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 25 वर पोहोचली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.