Nagpur : नागपूर हादरलं! सेवानिवृत्त शिक्षकासह एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन; परिसरात एकच खळबळ

Nagpur Crime Latest News : एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेत आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावात समोर आली आहे.
Four members of same family end lives in Nagpur
Four members of same family end lives in Nagpur
Updated on

नागपूर : एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेत आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील मोवाड गावात समोर आली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी आणि दोन मुलांचा समावेश आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून गाव आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विजय पचोरी (सेवानिवृत्त शिक्षक), पत्नी मालाबाई (गृहिणी), मुले दीपक आणि गणेश अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुर जिल्ह्यामधील नरखेड तालुक्यातील मोवाड गावात एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली . या कुटुंबाने एकत्रीत टोकाचे पाऊल उचल्ल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत असून भयंकर घटनेने गावात भितीचे वातावरण पसरले आहे. विजय पचोरी त्यांच्या पत्नी मालाबाई पचोरी आणि दीपक व गणेश पचोरी अशी मृतांची नावे आहेत. विजय पचोरी हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत, तर त्यांच्या पत्नी गृहिणी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Four members of same family end lives in Nagpur
Video: पुण्यातील पौडमध्ये कोसळलं हेलिकॉप्टर! पायलट जखमी, तीन जण थोडक्यात बचावले

दरम्यान या बाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आहेत. या संपूर्ण कुटुंबाने इतके टोकाचे पाऊल का उचचले असावे? यामगील नेमके कारण काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून पोलीस याबाबतचा तपास करत आहेत.

Four members of same family end lives in Nagpur
Zakir Naik on Beef : गोमांस खाणे हे इस्लाममध्ये 'फर्ज' नाही... झाकीर नाईक चक्क मोदी सरकारच्या पाठीशी? केलं मोठं वक्तव्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.