कामठी (जि.नागपूर): तालुक्यात दर दिवसाला बधितांचा आकडा फुगत असताना कोरोनाच्या मृत्यूमध्ये दररोज वाढ होत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज असले तरी शुक्रवारपासून शहरात सतत एकामागे एक चौघांचा मृत्यू झाल्याने कोरोणाच्या मृत्यूची साखळी कायम आहे. मागील एक आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढीवर असून आज पुन्हा27 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडल्याने व दोघांचा मृत्यू झाल्याने नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
साखळी तुटता तुटेना !
आतापर्यंत तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 239वर पोहोचली आहे. त्यातील60 रुग्णांनी कोरोनावर मात केली. शहरातील चार रुग्ण दगावले असून167 रुग्ण ऍक्टिव आहेत. पुन्हा 118 संशयीत रुग्णांचे कोरोना रॅपिड अँटीजेन चाचणी अहवाल अजूनही प्रलंबित आहेत.
आज मिळालेल्या27 रुग्णांमध्ये शहरातील सोळा, तर ग्रामीण भागातील अकरा रुग्णांमध्ये येरखेडा येथील पाच, कोराडी चार तर खैरी व रनाळा येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे.
अधिक वाचा : पाहता पाहता कोरोनाने अखेर ग्रामीणही घेतले ताब्यात, काय सांगते ही आकडेवारी...
शोधमोहित सुरूच
शहरातील सोळा रुग्णांमध्ये नया बाजार चार, वारिसपुरा तीन, फुटाणा ओली दोन, दाल ओली दोन तर जयभिम चौक, शुक्रवारी बाजार, हरदास नगर, गुजरी बाजार, कुंभारे कॉम्प्लेक्स परिसरातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. या सर्व रुग्णांना उपचारार्थ नागपूरच्या मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांचे निवासस्थान असलेला परिसर प्रतिबंधित करण्यात आला असून रुग्णाच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन नजीकच्या विविध विलीगीकरण कक्षात हलविण्यात आले. शुक्रवारी इमलीबाग येथील एका वर्षीय युवकाचा व रविवारी नया बाजार येथील72वर्षीय वृध्द महिलेचा उपचारादरम्यान नागपूरच्या मेयो रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ पुन्हा दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यात शहरातील त्याच नयाबजार परिसरातील रहिवासी 63 वर्षीय वृद्धाला मागील चार दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला असल्याने श्वास घेण्यास त्रास होत होता. यामुळे रविवारी रात्री मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. सोमवारी पहाटे श्वास घेणे कठीण झाले. काही वेळानंतर त्यांची हृदयक्रिया बंद पडली. त्याला न्युमोनियासह कोविड झाला असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. तर वारिसपुरा येथील रहिवासी51 वर्षीय इसमाला अस्थमाचा त्रास असल्यामुळे मागील 15 दिवसांपासून नागपूरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होता. त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने व कोरोणाचे लक्षणे दिसू लागल्याने तीन दिवसांपूर्वी मेयो रुग्णालयात "रेफर' करण्यात आले होते. आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. त्याला अस्थमासह कोविड झाला असल्याचे अहवालातून स्पष्ट झाले.
अधिक वाचा : पान खाऊन येतो म्हणून गेला, अन् परत आलाच नाही, काय घडले त्याच्याशी
"ती' तरूणी करीत होती नर्सची नोकरी
शुक्रवारपासून शहरात सतत एकामागे एक चौघांचा मृत्यू झाल्याने कोरोणाच्या मृत्यूची साखळी कायम आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्युत विहार कोराडी येथील रहिवासी असलेली तरुणी ही विद्युत वितरण कंपनीमध्ये ऑपरेटर म्हणून काम करीत होती. पार्ट टाईम म्हणून कामठीच्या लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये सुद्धा नर्सचे काम करत होती. 19 जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. तिच्या थेट संपर्कात आलेल्या परिवारातील चार सदस्यांना नागपूरच्या व्हीएनआयटी येथे क्वारंटाईन करण्यात आले होते. त्या चौघांचाही अहवाल आज पॉझिटिव्ह आला. त्यात तिची बहीण, बहिणीचा मुलगा, दोन वर्षीय मुलगी व गुमथी प्राथमिक आरोग्य केंद्रात सेविका म्हणून कार्य करणा-या तिच्या आईचा समावेश आहे. चार दिवसांपूर्वी या आरोग्य केंद्रात एक बैठक घेण्यात आली होती त्यात जि. प.सदस्य, प. स. सदस्यांसह ते जण या बैठकीला उपस्थित होते. त्यांना चहापान देण्याचे काम या महिलेने केले होते. त्यामुळे या बैठकीला उपस्थित नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
संपादन : विजयकुमार राऊत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.