नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागाशी संलग्न जिल्हा रुग्णालय असो की, ग्रामीण रुग्णालय. त्यात रक्त व इतर चाचण्यांसह सर्व उपचार मोफत होतात. रुग्णांच्या हाती प्रिस्क्रिप्शन देत नाही. मात्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये रक्त चाचणीपासून तर प्रत्येक चाचणीचे शुल्क घेतात. विशेष असे की, राज्यातील सर्वच जिल्हा रुग्णालयांशी संलग्न करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येत आहेत. यामुळे राज्यातील सर्वच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (मेडिकल कॉलेज) सर्वांना मोफत उपचार व्हावे, अशी मागणी जोर धरत आहे.