कुपोषित बालकांच्या जीवाशी खेळ; मिळणाऱ्या धान्याला चक्क लागली बुरशी

कुपोषित बालकांच्या जीवाशी खेळ; मिळणाऱ्या धान्याला चक्क लागली बुरशी
Updated on

नागपूर : कुपोषण मुक्तीसाठी (Malnutrition) ३ वर्षापर्यंतच्या बालकांना अंगणवाडी केंद्रातून (Anganwadi Centers) धान्य देण्यात येते. परंतु हे धान्य निकृष्ट असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे यापूर्वीही धान्य निकृष्ट (Bad quality grains) असल्याचे जिल्हा परिषदेतील (Nagpur zp)पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले होते. संबंधित पुरवठादारावर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती. परंतु त्यानंतरही धान्य योग्य नसल्याचे पदाधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न निर्माण केल्या जात आहे. (Fungus on grains which provided to Malnutrition children)

कुपोषित बालकांच्या जीवाशी खेळ; मिळणाऱ्या धान्याला चक्क लागली बुरशी
नागपूरकरांनो, कोरोना लसीचा दुसरा डोस हवाय? जाणून घ्या तुमच्या घराजवळील केंद्रांची यादी

वर्षभरापासून शाळांसह अंगणवाड्या बंद आहे. पूर्वी चिमुकल्यांना शिजलेला आहार मिळत होता. आता धान्य स्वरुपात अंगणवाडीतून हरभरा १ किलो, मुंग डाळ १ किलो, तिखट २०० ग्रॅम, हळद २०० ग्रॅम, खजूर २०० ग्रॅम, गहू २ किलो, साखर १ किलो, मीठ ४०० ग्रॅम आदी साहित्य देण्यात आले. मात्र त्यातही भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे चित्र आहे. मुंग डाळीला बुरशी लागली असून चार रंगाची डाळ आहे.

माती मिश्रित मीठ, छिद्र पडलेला हरभरा, भुसा मिश्रित तिकीट, कचरा मिश्रित गहू अंगणवाडीतून वितरित करण्यात येत असल्याचे तक्रारी आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांनी सहा महिन्यांपूर्वी शहराच्या नजीक भिलगाव परिसरातील अंगणवाड्यांना भेटी दिल्या होत्या. त्यावेळी त्यांना निकृष्ट दिसून आले होते. अंगणवाडीत कचरा व दुर्गंधी आढळल्याने कारवाईचा इशाराही दिला होता. तर त्या धान्याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. मात्र अद्यापही चौकशी सुरू झाली नाही. धान्याची गुणवत्ताही तपासली जात नसल्याचे दिसते.

कुपोषित बालकांच्या जीवाशी खेळ; मिळणाऱ्या धान्याला चक्क लागली बुरशी
"राज्य सरकार नौटंकीबाज"; मराठा आरक्षणावरून फडणवीसांचं टीकास्त्र
याबाबत तक्रारी केल्या आहेत. हे वाटप तत्काळ थांबवून पुरवठादारावर कारवाई करावी. कोरोना काळात बालकांच्या जिवाशी खेळणे योग्य नाही.
-राधा अग्रवाल, सदस्या, महिला व बाल कल्याण समिती, जि.प.

(Fungus on grains which provided to Malnutrition children)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()