Nagpur : सिटबेल्ट, एअरबॅगमुळे बचावले गडचिरोलीचे खासदार नेते; नागपूरजवळ कार-ट्रकमध्ये धडक

गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते यांच्या वाहनाला भरधाव सहाचाकी टिप्परने धडक
gadchiroli chimur mp ashok nete vehicle hit by a truck near nagpur police traffic
gadchiroli chimur mp ashok nete vehicle hit by a truck near nagpur police traffic Sakal
Updated on

नागपूर : गडचिरोली-चिमूरचे खासदार अशोक नेते यांच्या वाहनाला भरधाव सहाचाकी टिप्परने धडक दिली. मात्र ‘सीटबेल्ट’ लावलेला असल्याने आणि वेळीच ‘एअरबॅग’ उघडल्याने खासदार नेते, चालक, स्वीय सहाय्यक तसेच त्यांचे सुरक्षारक्षक थोडक्यात बचावले. नागपूरजवळील विहिरगाव जवळ अड्याळी फाट्याजवळ शनिवारी (ता.४) सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.

खासदार अशोक नेते शुक्रवारी (ता.३) मध्यरात्री मुंबईतून नागपूरला पोहोचले. नागपूर येथील शासकीय विश्रामगृहात मुक्काम करून शनिवारी सकाळी (ता.४) सकाळी गडचिरोलीला जाण्यासाठी निघाले. विहिरगावजवळ त्यांच्या वाहनासमोर (एमएच ३३ -एए ९९९०) अचानक टिप्पर (एमएच ४९- बीझेड ०६७४) आले.

दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यावेळी खासदार नेते यांच्यासह चालक, दोन सुरक्षारक्षक व स्वीय सहाय्यक व अन्य एक असे पाच जण वाहनात होते. अशोक नेते समोरच्या सीटवर होते. धडक होताच नेते यांच्यासह चालकाच्या बाजुला असलेली एअरबॅग उघडली. खासदार अशोक नेते, चालक व सर्वांनी सिटबेल्ट लावलेले होते.

त्यामुळे सर्व सुखरूप बचावले. अपघातानंतर रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी झाली. नागरिकांनी कारमधील प्रवाशांना मदत करण्यासाठी धाव घेतली. ट्रकच्या धडकेमुळे कारचा समोर भाग पूर्णपणे चेपला गेला. सुदैवाने यात कुणालाही दुखापत झाली नाही. हुडकेश्वर पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली. तोवर खासदार अशोक नेते, त्यांचे स्वीय सहाय्यक व पोलिस सुरक्षा रक्षक अतुल शेलोकर हे सर्व घटनास्थळीच होते.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत माने यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. त्यांनी खासदार नेते व त्यांच्या सहकाऱ्यांना दुसऱ्या वाहनाने गडचिरोलीकडे मार्गस्थ केले. आपल्यासह वाहनातील सर्व जण सुखरूप आहेत. काळजी करण्यासारखे कारण नाही. वाहनांचे नुकसान झाले असून दुरुस्तीसाठी संबंधित कंपनीकडे वाहन रवाना करण्यात आल्याचे नेते यांनी यावेळी स्पष्ट केले.

याप्रकरणी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. खासदार नेते यांच्या सुरक्षेसाठी विशेष पथकातील कर्मचारी देखील तैनात आहेत. त्यामुळे या अपघाताची सविस्तर माहिती ‘स्पेशल प्रोटेक्शन युनिट’च्या अधिकाऱ्यांनीही स्थानिक पोलिस व खासदार नेते यांच्या सुरक्षा रक्षकांकडून घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()