Gadchiroli Crime: गुंडापुरीतील हत्याकांड गूढ उकललं! अंधश्रद्धेतून आजीआजोबा अन् नातीचा खून, ९ आरोपी अटकेत

बुर्गी (येमली) हद्दीतील जंगलव्याप्त गुंडा येथील आजी-आजोबा व नातीच्या तिहेरी हत्याकांडाचे गूढ गडचिरोली पोलिसांनी उलगडले असून यात नऊ आरोपींना अटक केली आहे.
 Gadchiroli Crime: गुंडापुरीतील हत्याकांड गूढ उकललं! अंधश्रद्धेतून आजीआजोबा अन् नातीचा खून, ९ आरोपी अटकेत
Updated on

Gadchiroli Crime: जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील नक्षलदृष्ट्या अतिसंवेदशील असणाऱ्या पोलिस मदत केंद्र बुर्गी (येमली) हद्दीतील जंगलव्याप्त गुंडा येथील आजी-आजोबा व नातीच्या तिहेरी हत्याकांडाचे गूढ गडचिरोली पोलिसांनी उलगडले असून यात नऊ आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या संशयितांमध्ये धक्कादायक बाब म्हणजे मृत वृद्ध दाम्पत्याची दोन मुले, नातलग व ग्रामस्थांचा सहभाग आहे. अंधश्रद्धेतून हे खून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुंडापुरी शिवारातील शेतात असलेल्या झोपडीत ६ डिसेंबर २०२३ रोजी | रात्री देवू कुमोटी (वय ६०), त्याची पत्नी बिच्चे 144) वनात अर्चना तलांडी (वय १०) या तिघांचीही अत्यंत निर्दयीपणे लोखंडी हातोडा व धारदार सुरीने गळा कापून हत्या करण्यात आली. जिल्ह्यात खळबळ उडाली होती. देवू कुमोटी हा जादूटोणा करतो व त्यामुळे गावात अनेकांचे मृत्यू होतात, असा समज गावात पसरला होता. या अंधश्रद्धेतून देवूसोबत त्याची पत्नी व नातीचा खून करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी आज बुधवारी (ता. १३) पत्रकार परिषदेत दिली.

आरोपींमध्ये मृताचा मुलगा रमेश कुमोटी, विनु कुमोटी (मुलगाव फिर्यादी), तसेच त्यांचे नातेवाईक जोगा कुमोटी, गुना कुमोटी, राजू आत्राम (मला), नागेश उर्फ गोलू येमला, सुधा येमला, कन्ना हिचामी (सर्व रा. गुंडापुरी), तसेच मृताचा जावई तानाजी कंगाली (रा. विसामुंडी, भामरागड) यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मृताचा मुलगा विनू यानेच यासंदर्भात आलदंडी पोलिस स्टेशनात तक्रार दाखल केली होती व त्यालाच आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

अपर पोलिस अधीक्षक (अहेरी) एम. रमेश यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात पाच तपास पथके गठीत करण्यात आली. तपासादरम्यान असे लक्षात आले की फिर्यादीने तक्रार देताना कोणावरही संशय व्यक्त केला नव्हता. मात्र, नंतर अनोळखी दोन व्यक्तींनी परिवाराचा घातपात करण्याची धमकी दिली होती, अशी माहिती पोलिसांना दिली होती. ही बाब लपवून ठेवल्याने पोलिसांची संशयाची सुई विनू व कुटुंबियांकडे वळली. त्यानंतर या प्रकरणाचा छडा लागला.

 Gadchiroli Crime: गुंडापुरीतील हत्याकांड गूढ उकललं! अंधश्रद्धेतून आजीआजोबा अन् नातीचा खून, ९ आरोपी अटकेत
Maratha Reservation : 'येत्या 24 तारखेला आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर..'; NCP आमदाराचा सरकारला स्पष्ट इशारा

अंधश्रद्धेने केले अमानुष

अंधश्रद्धेच्या आहारी गेल्यामुळेच हे अमानुष हत्याकांड घडल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. देव कुमोटी हा या परिसरातील मोठा पुजारी असून तो जादुटोणा करून अनेकांना आजारी पाडतो व नंतर त्यांचा मृत्यू होतो, असा संशय गुंडापुरीतील व त्या परिसरालगत असलेल्या काही गावांमध्ये पसरला होता.

अलीकडे जे मृत्यू झाले त्याला देवूने केलेला जादुटोणाच कारणीभूत असल्याचा समज करून बसला. ग्रामस्थांच्या मनात घर करुन बसली. त्यामुळे गावात यापूर्वी दोन-तीन वेळा पंचायत बोलवून देऊला समज देण्यात आली होती. देवूमुळे आपल्याला ग्रामस्थांचा त्रास होतो या भावनेतून त्याची दोन्ही मुले व नातलगांनीच हे हत्याकांड घडविल्याची माहिती पोलिस अधीक्षकांनी पत्रकार परीषदेत देण्यात आली. (Latest Marathi News)

अशी केली हत्या

■ आरोपींना कट रचून देवूच्या डोक्यावर हातोडीने जोरदार प्रहार करून व त्याची पत्नी बिच्चे हिचा धारदार सुरीने गळा कापून निर्घृण हत्या केली. घटनेच्या वेळी देवूची नात अर्चना तलांडी हीसुद्धा होती. ती पोलिसांना माहिती देईल, या भीतीने तिचादेखील धारदार सुरीने गळा कापून खून केला. ग्रामस्थांच्या सततच्या दबावामुळे मृताची मुले या हत्याकांडात सहभागी झाल्याचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी पत्रकार परीषदेत सांगितले.

 Gadchiroli Crime: गुंडापुरीतील हत्याकांड गूढ उकललं! अंधश्रद्धेतून आजीआजोबा अन् नातीचा खून, ९ आरोपी अटकेत
Congress MP Suspended: संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन लोकसभेत विरोधकांचा गोंधळ; काँग्रेसच्या 5 खासदारांचं निलंबन!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.