गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठात रासेयो विभागाच्या वतीने २५ डिसेंबर २०२३ ते ३ जानेवारी २०२४ या कालावधीत राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिर 'आव्हान-२०२३' आयोजित करण्यात आले आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या कार्यालयाकडून या शिबिराचे आयोजन करण्यात येत असून यावर्षी गोंडवाना विद्यापीठात प्रथमच हे आपत्ती व्यवस्थापन शिबिर होत आहे, अशी माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी शुक्रवार (ता. २२) पत्रकार परीषदेत दिली.
या शिबिराविषयी माहिती देताना प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे म्हणाले की, या शिबिरात २२ विद्यापीठांमधील ५८० विद्यार्थी आणि ४२० विद्यार्थिनी स्वयंसेवक असे एकूण १००० विद्यार्थी, याशिवाय ३७ पुरूष कार्यक्रम अधिकारी आणि ३७ स्त्री कार्यक्रम अधिकारी सहभागी होणार आहेत. शिबिराचे उद्घाटन सोमवार (ता. २५) दुपारी १२ वाजता स्थानिक सुमांनद सभागृहात होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, जिल्हाधिकारी संजय मीणा, प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, एन. डी. आर.एफ. कमांडर एस. बी. सिंह आदी उपस्थित राहतील.
बुधवार ३ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता सुमांनद सभागृहात या प्रशिक्षण शिबिराचा समारोप होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, खासदार अशोक नेते, आमदार डाॅ. देवराव होळी, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार कृष्णा गजबे, प्रादेशिक संचालक (महाराष्ट्र, गोवा) प्रादेशिक संचालनालय, रा. से. यो. पुणे डॉ. अजय शिंदे उपस्थित राहतील. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे राहतील. १० दिवस चालणाऱ्या या शिबिराची तयारी पूर्ण झाली असून शिबिरासाठी ३० समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. या पत्रकार परीषदेला प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डाॅ. अनिस हिरेखण, रासेयोचे संचालक डाॅ. श्याम खंडारे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. अनिल चिताडे आदी उपस्थित होते.
२२ विद्यापीठांचा सहभाग
मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, , कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर विद्यापीठ, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यापीठ, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नीकल विद्यापीठ, कविकुलगुरू कालीदास संस्कृत विद्यापीठ, होमी भाभा राज्य विद्यापीठ, सिंध नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ, मुंबई अशा २२ विद्यापीठांचा सहभाग राहिल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.