Gadchiroli Tiger: गडचिरोलीत आढळल्या'त्या' वाघाच्या पाउलखुणा, चिंतलपेठ गावातील महिलेला केले होते ठार

येथून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंतलपेठ येथील सुषमा देविदास मंडल या महिलेला ७ जानेवारी २०२४ ला ठार करणाऱ्या वाघाच्या पाउलखुणा (पग मार्क्स) येथून जवळच असलेल्या शिवनीपाठ गावात आढळले आहेत.
Gadchiroli Tiger: गडचिरोलीत आढळल्या'त्या' वाघाच्या पाउलखुणा, चिंतलपेठ गावातील महिलेला केले होते ठार
Updated on

Gadchiroli Man Killing Tiger Footprints : येथून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंतलपेठ येथील सुषमा देविदास मंडल या महिलेला ७ जानेवारी २०२४ ला ठार करणाऱ्या वाघाच्या पाउलखुणा (पग मार्क्स) येथून जवळच असलेल्या शिवनीपाठ गावात आढळले आहेत.

त्यामुळे या दोन्ही गावांतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या या परिसरात वाघाची प्रचंड दहशत असतानाही वनविभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

मात्र, आम्ही भरपूर उपायोजना करत आहोत, असे वनविभागाचे अधिकारी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून चिंतलपेठ येथील नागरिकांना घराबाहेर निघण्याची भीती वाटत असत. पण सावध राहण्याचा १०० रुपयांचा एक साधा बॅनरसुद्धा या गावात वनविभागाने लावला नसल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

चिंतलपेठ येथे सुषमा मंडल या महिलेचा बळी घेतल्यानंतर त्या दिवशी दिवसभर वाघ याच परिसरात सक्रिय होता. या परीसराच्या बाजूलाच दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जामगाव रस्त्यावर गुरांचा पाठलाग करताना या वाघाला अनेकांनी बघितले. वाघाच्या भीतीने चिंतलपेठ व जामगाव येथील नागरिकांनी गुरांना जंगलातच सोडले आणि ते गावाकडे परत आले.

यानंतर दुसऱ्या दिवशी महागाव, सुभाषनगर, मुत्तापुर, वडलापेठ आदी गावांच्या परिसरात वाघ फिरत असल्याची चर्चा ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात होती. चर्चेच्या या भितीतून आणि वाघासंदर्भात पसरलेल्या अफवांमुळे नागरिक प्रचंड भयभित झाले आहेत. त्यामुळे शेतीकाम व इतर कामांसाठी जाणारे बहुतेक नागरिक घरीच होते. (Latest Marathi News)

केवळ दुचाकी आणि चारचाकी वाहनधारक कसेबसे गावाच्या बाहेर पडत होते. यादरम्यान चिंतलपेठ इथून जवळच असलेल्या शिवनीपाठ या गावाच्या आजूबाजूला वाघाचे पगमार्क म्हणजेच पावलांच्या खुणा अनेक गावकऱ्यांना दिसल्या. यावरून तूर्तास या वाघाचा मुक्काम चिंतलपेठ व शिवनीपाठ तसेच जवळपासच्या गावादरम्यान असल्याचे लक्षात येत आहे. या हल्लेखोर वाघाने चिंतलपेठ परिसरात तळ ठोकला असल्याने संपूर्ण परिसर भयग्रस्त आहे.

मात्र, या समस्येसंदर्भात वनविभाग फारसा गंभीर नसल्याचेसुद्धा दिसून येते. स्वतःची सुरक्षितता राखून वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकारी चारचाकी वाहनांमध्ये येऊन आपले दौरे करत आहेत. गावाच्या आजूबाजूला कुठेतरी आम्ही दौरे करतो हे भासवत आहेत. वाहनाच्या खाली उतरून जंगलात फिरण्याची हिंमत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये नसल्याचे स्पष्ट दिसून येते. एकंदरीत वनविभाग स्वतःलाच असुरक्षित समजत आहे. त्यामुळे लोकांमधील भिती अधिकच वाढली आहे.

Gadchiroli Tiger: गडचिरोलीत आढळल्या'त्या' वाघाच्या पाउलखुणा, चिंतलपेठ गावातील महिलेला केले होते ठार
Ayodhya Pran Pratishtha : अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्राणप्रतिष्ठेच्या विधीला सुरुवात; खास फोटो आले समोर

जनजागृतीची गरज...
चिंतलपेठ व परिसर वनविभाग आलापल्लीअंतर्गत येते. येथे वाघाने महिलेला ठार केल्याची दुर्दैवी घटना घडूनही वनविभाग फारसे गंभीर नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. चिंतलपेठ, आपापल्ली, वडलापेठ या गावांमध्ये शंभर, दोनशे रुपयांत तयार होणारे साधे बॅनर किंवा फलकही लावले नाही. ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून गावागावांमध्ये मुनादी किंवा दवंडी देण्याचे काम वनविभागाकडून अपेक्षित होते.

वनविभागाकडे वाहनांचा मोठा फौजफाटा असताना ही बाबसुद्धा वनविभागाकडून टाळल्या जात असल्याचे दिसून येत आहे. या परिसरात वाघाचे पग मार्क आढळले याचा अर्थ वाघ परिसरातच आहे. ही बाब सामान्य माणूससुद्धा समजू शकतो. (Latest Marathi News)

पण वनविभागाकडून या वाघाला जेरबंद करण्यासंदर्भात व ग्रामस्थांना भयमुक्त करण्यासंदर्भात काहीच हालचाली होताना दिसत नाहीत. वनविभाग तातडीने या वाघाला जेरबंद करू शकत नसेल तर किमान वनविभागाने लोकांशी संवाद साधत त्यांच्या मनातील भय दूर करणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यापक जनजागृतीचीही गरज व्यक्त होत आहे.

Gadchiroli Tiger: गडचिरोलीत आढळल्या'त्या' वाघाच्या पाउलखुणा, चिंतलपेठ गावातील महिलेला केले होते ठार
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिरासाठी दान केलं 101 किलो सोनं! सुरतमधील 'हा' व्यापारी आहे तरी कोण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.