Ganeshotsav 2022 ...अशी ओळखा मातीची गणेश मूर्ती

प्लॅस्टर ऑफ पॅरिसला उत्कृष्ट पर्याय; पर्यावरण पूरक गणपती म्हणून महत्त्व
ganeshotsav 2022 how to identify clay Ganesha idol environmental nagpur
ganeshotsav 2022 how to identify clay Ganesha idol environmental nagpursakal
Updated on

नागपूर : पर्यावरण पूरक म्हणून मातीच्या गणपती मूर्तीची ओळख आहे. तर, प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्ती पर्यावरणाला हाणी पोहोचवतात. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपी मूर्तीवर बंदी आणूनही या मूर्ती हद्दपार होताना दिसत नाही. यावर्षी देखील हीच परिस्थिती आहे. मातीची मूर्ती निवडण्यापूर्वी याबाबी लक्षात घेतल्या पाहिजे. अनेक गणेश भक्त पर्यावरण राखण्याचा दृष्टिकोन आणि मूर्ती विसर्जित करताना विघ्न येऊ नये म्हणून मातीच्या मूर्तीच्या शोधात असतात. मात्र, ही मूर्ती ओळखणे कठीण जात असल्याने मातीची मूर्ती असल्याचे सांगून विक्रेत्यांकडून ग्राहकांची फसवणूक केली जाते. नागपूर महापालिकेने यंदा पीओपी मूर्तीबाबत आपले धोरण जाहीर न केल्याने यंदा पीओपी मुर्ती विक्रेत्यांचे फावले, असे म्हणावे लागेल. विशेष म्हणजे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेसुद्धा पीओपी गणपती मूर्ती म्हणून विकण्यास मागील वर्षी नकार देऊनही पीओपी मूर्तीची विक्री अद्याप थांबली नाही.

मूर्ती निवडताना निरीक्षण करा

  • मूर्तीच्या मागे छिद्र : पीओपी मूर्तीच्या तुलनेत मातीची मूर्ती तयार केल्यानंतर वाळायला वेळ लागतो. तयार केलेली मूर्ती आतमधून योग्य पद्धतीने सुकावी, भेगा पडू नये म्हणून मूर्तीला मागे एक छिद्र ठेवण्यात येते. तर, पीओपी मूर्तीला असे छिद्र असत नाही.

  • प्रत्येक मूर्तीमध्ये विविधता : मातीची मुर्ती बनविताना पूर्णपणे साचा वापरला जात नाही. त्यामुळे, धडापासून मूर्तीचे सर्व अवयव दूरदूर दिसतात. मूर्तीवर असलेला उंदीर देखील चिकटलेला दिसत नाही. पीओपीमूर्ती साचा वापरून तयार करण्यात येत असल्याने उंदीर मूर्तीला पूर्णपणे चिकटलेला दिसतो.

  • लाकडी पाटाचा वापर : मातीची मूर्ती हाताने बनविण्यात येत असल्याने ती बनवताना शक्यतो लाकडी पाटाचा वापर केला जातो.

  • मूर्तीचे वजन : पीओपी मूर्ती हलकी व मातीची वजनदार असते. हे ओळख लपविण्यासाठी मूर्तीच्या तळात वजनदार वस्तू भरल्या जाते. अशावेळी थोडे कोरल्यास आतील अवजड वस्तू नजरेस पडतील. पूर्ण मातीच दिसल्यास ती मुर्ती शुद्ध मातीची असेल.

  • मूर्तीची चमक : पीओपी मूर्ती अधिक चमकदार आणि मातीची मूर्ती कमी चमकदार दिसते. हा फरक निरखून पाहावा.

माती मूर्तीबाबत गणेश भक्त मोठ्या प्रमाणात जागरूक झाले आहेत. मात्र, पीओपी विक्रेत्यांकडून शाडू मातीची मूर्ती सांगून विक्री केली जाते. या फसवणुकीपासून भक्तांनी सावध राहायला हवे.

-सुरेश पाठक, अध्यक्ष, पारंपरिक मूर्तिकार व हस्तकला कारागीर संघ, नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.