Ganeshotsav : दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप

गणेशाची स्थापना झाल्यानंतर दीड दिवस, पाचव्या तसेच सातव्या दिवशी गणेशाचे विसर्जन केले
nagpur
nagpur sakal
Updated on

नागपूर - घराघरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या दीड दिवसांच्या गणेशाला आज (ता. २०) वाजतगाजत निरोप देण्यात आला. गणेश विसर्जनासाठी सायंकाळनंतर भक्तांनी गर्दी केली होती.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

गणेशाची स्थापना झाल्यानंतर दीड दिवस, पाचव्या तसेच सातव्या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते. आज दीड दिवसाच्या गणपतीला दुपारनंतर लहानथोरांनी निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणा देत बच्चे कंपनी गटागटाने जात होती.  मुख्यत्वे शहरातील गांधीसागर, सक्करदरा,

फुटाळा, सोनेगाव तलाव परिसरात भाविकांची संध्याकाळी गर्दी झाली होती. गणेशभक्त आपल्या कुटुंबीयांसमवेत मोठ्या भक्तिभावाने आरती करत गणेशमूर्तींचे विसर्जन करत होते.

nagpur
Nagpur News : महिला आरक्षण घराणेशाहीतील महिलांसाठी नको; नागपूरकर महिलांच्या भावना

पुढच्या वर्षी लवकर या

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’, ‘एक लाडू फुटला गणपती बाप्पा उठला’, ‘एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार...’ असा जयघोष करीत नदीपात्रात तरुणांनी उतरून बाप्पाला निरोप दिला. काही कुटुंबीयांनी शहरातील चौकांमध्ये महापालिकेने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम हौदामध्ये विसर्जन केले. घरापासून चौकापर्यंत वाजत-गाजत जल्लोषात गणरायाची छोटेखानी मिरवणूक काढत गणेशभक्तांनी आनंदोत्सव साजरा केला.

nagpur
Solapur Crime : आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी व सावकारी अधिनियमा प्रमाणे पती-पत्नी विरोधात गुन्हा दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.