Railway : ऐन गणेशोत्सवात अनेक रेल्वेगाड्या रद्द; प्रवाशांचा हिरमोड

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात खरसिया-रायगडमध्ये भूपदेवपूर रेल्वे स्थानकाला तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाशी जोडण्यात येणार आहे.
railway
railwaysakal
Updated on

नागपूर - दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात खरसिया-रायगडमध्ये भूपदेवपूर रेल्वे स्थानकाला तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे नागपूर विभागातून जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द तसेच शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.

काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहेत. बिलासपूर विभागात १० ते २२ सप्टेंबरदरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या लाइनचे काम केले जाणार आहे.

रक्षाबंधन संपल्यानंतर पोळा आणि लगेचच गणेशोत्सव सुरू होत आहे. या काळात प्रवाशांची वर्दळ वाढते. मात्र, गाड्या रद्द करणे किंवा वळविल्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.