गंगाजमुनाला आले पोलिस छावणीचे स्वरूप; अल्पवयीन मुली ताब्यात

गंगाजमुनाला आले पोलिस छावणीचे स्वरूप; अल्पवयीन मुली ताब्यात
Updated on

नागपूर : वैश्‍याव्यवसायासाठी कुप्रसिद्ध असलेली गंगाजमुना वस्ती पूर्णपणे सील करण्यात आली आहे. गंगाजमुनाला सध्या पोलिस छावणीचे स्वरूप आले असून, प्रत्येक गल्लीत पोलिस तैनात आहे. पोलिसांच्या या कारवाईला गंजाजमुना वस्तीमुळे त्रस्त असलेल्या लोकांनी पाठिंबा दिला आहे. अनेक नागरिक आणि महिलांनी आज पेढे वाटून आनंद साजरा केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाजमुना वस्तीबाबत आतापर्यंत अनेक तक्रारी लकडगंज पोलिस स्टेशन आणि पोलिस आयुक्त कार्यालयात आल्या होत्या. सामान्य नागरिकांना वेश्‍यावस्तीमुळे होणारा त्रास असह्य झाला होता. त्यामुळे पोलिसांनी बुधवारी सायंकाळी २०० महिलांसह पोलिसांचा ताफा तैनात केला.

गंगाजमुनाला आले पोलिस छावणीचे स्वरूप; अल्पवयीन मुली ताब्यात
यवतमाळातील हेलिकॉप्टर अपघातावर कॅप्टन अमोल यादव म्हणाले...

पोलिस आयुक्तांच्या या निर्णयाचे वस्तीच्या आजूबाजूला राहणाऱ्या सामान्य नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. गुरुवारी सकाळी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला. गंगाजमुना बंद झाल्याची बातमी शहरभर पसरताच अनेक आंबटशौकीनांनी उत्सुकतेपोटी गंगाजमुनाकडे धाव घेतली. त्यामुळे पोलिसांना त्यांना हटविण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला.

अल्पवयीन मुली ताब्यात

लकडगंजचे ठाणेदार पराग पोटे यांनी महिला पोलिसांसह गंगाजमुना वस्तीत देहव्यापार करणाऱ्या अल्पवयीन मुलींसाठी शोधमोहीम राबविली. सायंकाळपर्यंत काही अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले होते. त्यांचे ठाण्यात बयाण घेण्यात आले. त्यांच्याकडून बळजबरी वेश्‍याव्यवसाय करवून घेणाऱ्या महिला दलालांवर कारवाई करण्यात येणार आहे.

बघ्यांची गर्दी

गंगाजमुना पोलिसांनी बंद केल्याची माहिती मिळताच अनेक जणांनी गंगाजमुना बघण्यासाठी गर्दी केली. पोलिस परिसरात कारवाई करीत असताना रस्त्यावरील गर्दीमुळे ट्रॅफिक जाम होत होता. त्यामुळे पोलिस कर्मचारी वारंवार बघ्यांची गर्दी पांगवीत होते. परंतु, पोलिस हटताच पुन्हा गर्दी होत होती.

जमावबंदी लागू तरीही मोठी सभा

गंगाजमुना परिसरात पोलिस आयुक्तांनी कलम १४४ जमावबंदी लागू केली असून, पाच पेक्षा जास्त लोक जमा होण्यास प्रतिबंध घालण्यात आला होता. पोलिसांच्या नाक्कावर टिच्चून सकाळी अकरा वाजता तेथे सभा घेण्यात आली. एकाही पोलिस अधिकाऱ्यांनी साधा जाबही विचारला नाही किंवा गुन्हाही दाखल केला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गंगाजमुनाला आले पोलिस छावणीचे स्वरूप; अल्पवयीन मुली ताब्यात
दहावीची विद्यार्थिनी झाली प्रसूत; वडीलावर बलात्काराचा गुन्हा

धन्यवाद सीपीसाहेब...

सीपीसाहेब खूप खूप धन्यवाद... मी सेवानिवृत्त शिक्षक आहे. मुलीचे लग्न जुळले होते. परंतु, गंगाजमुनाजवळील परिसरात राहत असल्यामुळे मुलाने लग्नास नकार दिला, अशी प्रतिक्रिया नागरिकाने दिली. महिला म्हणाली, तीन वर्षांपूर्वी दिवाळीत माझ्या घरी पाहुणे आले असता त्यांच्या मुलींकडे ‘त्याच’ नजरेने वस्तीतील लोक बघत होते. तिच्यावर कमेंट करीत होते. तेव्हापासून आमच्याकडे नातेवाईकसुद्धा यायला नकार देतात. मुलगा नोकरीवर आहे, त्याच्या लग्नासाठी मुलगी बघितली परंतु मुलीच्या वडिलांनी बेरोजगाराला देऊ पण गंगाजमुनाशेजारी राहणाऱ्या युवकाला मुलगी देऊ शकत नाही, असे अपमानित करून लग्न करण्यास नकार दिला, अशा प्रतिक्रिया काही नागरिकांनी ‘सकाळ’शी बोलताना दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.