नागपूर : वेश्याव्यवसायासाठी कुप्रसिद्ध असलेली गंगाजमुना वस्ती काही दिवसांपूर्वी पूर्णपणे सील करण्यात आली. गंगाजमुनातील प्रत्येक गल्लीत पोलिस तैनात केले आहे. पोलिसांच्या या कारवाईला गंजाजमुना वस्तीमुळे त्रस्त असलेल्या लोकांनी पाठिंबा दिला आहे. तर अनेकांकडून विरोध होत आहे. यामुळे काही दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आले होते. रविवारी पुन्हा येथे वाद उफाळून आला. यामुळे येथे चांगलाच तणाव निर्माण झाला होता.
गंगाजमुना वस्तीबाबत अनेक तक्रारी लकडगंज पोलिस स्टेशन आणि पोलिस आयुक्त कार्यालयात आल्या होत्या. सामान्य नागरिकांना वेश्यावस्तीमुळे होणारा त्रास असह्य झाला होता. त्यामुळे पोलिसांनी गंगाजमुना पूर्णपणे बंद करून पोलिसांचा ताफा तैनात केला. तेव्हापासून गंगाजमुनाला हटवा म्हणणारे आणि बचाव करणाऱ्यांमध्ये वाद होत आहे.
गंगाजमुना सील केल्याने विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी गंगाजमुना बस्तीत पोहोचून आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी ही वस्ती सील करून मोठी जागा धनदांडग्यांच्या घशात टाकण्याचा डाव रचल्याचा आरोप त्यांनी केला होता. शांततेने सुरू असलेले आंदोलन अचानक हिंसक झाले आणि ज्वाला धोटे यांच्या नेतृत्वात वारांगनांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकॅडिंग तोडून फेकले होते.
याला काही दिवस लोटत नाही तोच रविवारी रक्षाबंधनाच्या दिवशी येथे पुन्हा वाद उफाळून आला. गंगाजमुनाला विरोध करणारे आणि त्यांची बाजू घेणारे आमोरा-सामोर आल्याने येथे चांगलाच तणाव निर्माण झाला होता. यामुळे पोलिसांना समोर यावं लागले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.