नागपूर ः भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी एका टोळीने दुसऱ्या टोळीतील महिलेसह दोन सदस्यांवर तलवारीने हल्ला केला. मात्र,, दोघेही थोडक्यात बचावले. गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत. ही थरारक घटना गणेशपेठेतील कर्नलबाग परिसरात रविवारी सायंकाळी घडली. देविका ज्ञानेश्वर कळंबे (वय ४५ रा. नवीन शुक्रवारी) व अंकित ऊर्फ एबी चंद्रभान बोकडे (वय १८ रा. तांडापेठ), अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी गणेशपेठ पोलिसांनी सारंग उघडे (रा.रामाजी वाडी), संकेत नाईक व त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांविरुद्ध प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल केला. दोन टोळ्या एकमेकांसमोर उभ्या ठाकल्यामुळे आता गणेशपेठेत गॅंगवॉर भडकणार, असे संकेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देविका कळंबे ही भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. राहुल ग्रावकर आणि अंकित बोकडे हे दोघे देविकाकडे भाजी विक्री करण्याचे काम करतात. सारंगचा भाऊ शैलेष उघडे हा सुद्धा भाजीचा व्यवसाय करीत होता. त्याने देविकाकडून १०० किलो टमाटर बाजारात विकण्यासाठी घेतले होते. मात्र, त्याचे पैसे देण्यास तो टाळाटाळ करीत होता. याच कारणावरून देविका आणि शैलेषमध्ये वाद सुरू होता. देविकाचा मुलगा आकाश ऊर्फ बंटी कळंबे, अंकीत बोकडे. राहुल आणि अन्य आरोपींच्या टोळीने गेल्यावर्षी एप्रील महिन्यात शैलेषचा खून केला होता.
काही महिन्यानंतर आरोपी जामिनावर सुटले होते. तेव्हापासून शैलेषचा भाऊ सारंग उघडे हा भावाच्या खुनाचा बदला घेण्याच्या तयारीत होता. रविवारी मॉडेल मिल चौक ते रामकुलर चौकाकडे जाणाऱ्या रोडवर देविकाने भाजीचे दुकान लावले होते. देविका, अंकित आणि राहुल हे तिघे दुकानातील सामान घरी पोहचवित होते. यादरम्यान सारंग, संकेत आणि त्याच्या दोन साथिदारांनी अंकित याच्यावर रॉडने व शस्त्रांनी हल्ला केला.
अंकित याला वाचविण्यासाठी देविका गेला. सारंग याने देविका यांच्यावर कोयत्याने वार केला. त्यांनी वेळीच हात आडवा केला. दोन्ही हाताच्या बोटाला दुखापत झाली. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले. घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
संपादन - अथर्व महांकाळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.